ST strike : गणेशोत्सवाक गावी एसटीने जाऊचा हां? मग एसटीच्या संपाची ‘ही’ बातमी वाचाच!

Share

कधी असणार संप? काय आहेत मागण्या?

मुंबई : बेस्ट कंत्राटी कर्मचार्‍यांच्या आठ दिवसांच्या संपानंतर अखेर मागण्या मान्य झाल्याने नुकताच हा संप मागे घेण्यात आला. मात्र दोनच दिवसांनंतर आता एसटी कर्मचार्‍यांकडून संपाची (ST Strike) हाक देण्यात आली आहे. पगारवाढ, पदोन्नती अशा विविध मागण्यांसाठी हे कर्मचारी ११ सप्टेंबरपासून संपावर जाण्याचा इशारा एसटी कर्मचाऱ्यांच्या मान्यताप्राप्त संघटनेकडून देण्यात आला आहे. छत्रपती संभाजीनगर (Chhatrapati Sambhajinagar) येथे महाराष्ट्र एसटी कामगार संघटनेच्या झालेल्या कोअर कमिटीच्या (Core committee) बैठकीत संपाविषयीचा हा निर्णय घेण्यात आला आहे.

एसटी कर्मचाऱ्यांच्या मान्यताप्राप्त संघटनेने प्रलंबित मागण्यांसाठी संपाची हाक दिली आहे. हे कर्मचारी मुंबईतील आझाद मैदानात (Azad maidan) बेमुदत उपोषण करणार आहेत. जर सरकारने ऐकले नाही तर १३ सप्टेंबरपासून प्रत्येक जिल्ह्यात प्रत्येक आगारात कर्मचारी काम बंद करून उपोषणाला बसणार आहेत. दरम्यान, १९ सप्टेंबरला गणेशचतुर्थी आहे. कोकण रेल्वेचे (Konkan Railway) बुकिंगही दोन महिन्यांपूर्वीच फुल्ल झाल्याने आता एसटीने प्रवास करु इच्छिणाऱ्यांचेही हाल होणार आहेत.

काय आहेत मागण्या?

१. करारातील तरतुदीनुसार सरकारने ४२% महागाई भत्ता त्वरीत लागू करावा, घरभाडे भत्ता, वेतनवाढीचा दर यांचा फरक त्वरीत अदा करावा.

२. मूळ वेतनात जाहीर झालेल्या पाच हजार, चार हजार, अडीच हजारामुळे सेवाज्येष्ठ कर्मचा-यांच्या वेतनात निर्माण झालेल्या विसंगती दूर कराव्यात.

३. दहा वर्षांसाठी सातवा वेतन आयोग लागू करावा.

४. एसटीची धाववेळ (Running time) निश्चित करावी. तसेच वाहकांचे (Conductor)) बदली धोरण रद्द करावे.

५. खाजगी गाड्यांऐवजी स्वमालकीच्या नवीन बसेसचा पुरवठा त्वरीत करण्यात यावा.

६. लिपिक- टंकलेखक पदाच्या बढतीसाठी २४० हजर दिवसांची अट रद्द करावी.

७. सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांच्या पत्नीसह व विद्यमान कर्मचाऱ्यांना महामंडळाच्या सर्व प्रकारच्या गाड्यांचा वर्षभर मोफत फॅमिली पास देण्यात यावा.

८. अनेक विभागात १०-१२ वर्षापासून कर्मचारी TTS आहेत त्यांना एकवेळची बाब म्हणून TS करण्यात यावे.

९. जुल्मी शिस्त व आवेदन कार्यपद्धती त्वरीत रद्द करावी.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

 

Recent Posts

‘आरटीई’अंतर्गत शाळा प्रवेशाची प्रक्रिया मुंबईत सुरू

मुंबई : शैक्षणिक वर्ष २०२४-२०२५ साठी ‘शिक्षण हक्क अधिनियम’ अर्थात ‘आरटीई’अंतर्गत २५ टक्के आरक्षित जागांसाठीच्या…

10 hours ago

मलाच मुख्यमंत्री बनवा अन्यथा मातोश्रीतले बिंग फोडेन!

संजय राऊत यांनाच मुख्यमंत्री व्हायचे होते, त्यासाठी उद्धव ठाकरेंना ब्लॅकमेल केल्याचा आमदार नितेश राणे यांचा…

11 hours ago

Lok Sabha Election : राहुल गांधी आणि अखिलेश यादव यांच्या सभेत चेंगराचेंगरी

दोन्ही नेते भाषण न करता निघून गेले फुलपूर : लोकसभा निवडणुकीच्या (Lok Sabha Election) पार्श्वभूमीवर…

12 hours ago

Cloudburst : अरे बाप रे! मे महिन्यात इतका पाऊस कसा झाला? हवामान विभागालाही पडला प्रश्न

चिपळूणात ढगफुटी, अडरे गावात अर्ध्या तासात रेकॉर्डब्रेक पाऊस, नद्या दुथडी भरुन वाहू लागल्या चिपळूण :…

12 hours ago

काँग्रेस म्हणजे भ्रष्टाचाराची जननी

काँग्रेस आणि झामुमो यांनी झारखंडला लुटण्याची एकही संधी सोडली नाही पंतप्रधान मोदींनी विरोधकांना झोडपले! जमशेदपूर…

12 hours ago

पतंजलीच्या उत्पादनाचा दर्जा निकृष्ट! सोनपापडी गुणवत्ता चाचणीत फेल, तिघांना तुरुंगवास

नवी दिल्ली : फसव्या जाहिरातींप्रकरणी सर्वोच्च न्यायालयाच्या दणक्यामुळे पतंजली कंपनीचे संस्थापक रामदेव बाबा आणि बाळकृष्ण…

12 hours ago