Kokan Railway : कोकणात जाऊचा हां?… पण मेगाब्लॉक लावल्यानी!

Share

कोकण रेल्वे मार्गावर उद्या तीन तासांचा मेगाब्लॉक

जाणून घ्या वेळापत्रक…

रत्नागिरी : चाकरमान्यांसाठी जिव्हाळ्याचा विषय असणा-या कोकण रेल्वेच्या (Kokan Railway) देखभाल आणि दुरुस्तीच्या कामांसाठी उद्या २१ जूनला रत्नागिरी (Ratnagiri) ते वैभववाडी (Vaibhavwadi) दरम्यान सकाळी ७:३० ते १०:३० या कालावधीत तीन तासांचा मेगाब्लॉक घेण्याचा निर्णय कोकण रेल्वेकडून घेण्यात आला आहे. मालमत्तेच्या देखभालीच्या कामासाठी मेगाब्लॉक (Megablock) घेतला जाणार असल्याचं रेल्वे प्रशासनानं सांगितलं आहे.

मेगाब्लॉकमुळे गाडी क्र. ११००३ दादर – सावंतवाडी रोड तुतारी एक्स्प्रेस (Tutari Express), गाडी क्र. १०१०६ सावंतवाडी रोड – दिवा एक्स्प्रेस (sawanytvadi – diva Express), नेत्रावती एक्सप्रेस (Netravati Express), कोकण कन्या एक्सप्रेस (Konkan Kanya Express) व मांडवी एक्स्प्रेस (Mandovi Express) अशा गाड्यांच्या वेळापत्रकावर परिणाम होणार आहे.

दरम्यान, प्रवाशांना प्रवास करताना होणाऱ्या अडथळ्यांमुळे आणि गैरसोयीबद्दल रेल्वे प्रशासनाने दिलगिरी व्यक्त केली आहे. तसेच कोकण रेल्वे मार्गानं प्रवास करणाऱ्या प्रवाशांनी वेळापत्रक पाहावं आणि गाड्यांमध्ये होणाऱ्या बदलाची नोंद घ्यावी, असं आवाहनही कोकण रेल्वे प्रशासनाने केलं आहे.

काय बदल होणार?

गाडी क्र. ११००३ दादर – सावंतवाडी रोड तुतारी एक्स्प्रेस रोहा ते रत्नागिरी दरम्यान अडीच तास रोखून ठेवली जाणार आहे. उडुपी – कणकवली विभागादरम्यान गाडी क्र. १६३४६ तिरुवनंतपुरम सेंट्रल – लोकमान्य टिळक नेत्रावती एक्सप्रेस तीन तासांसाठी थांबवून ठेवली जाणार आहे. ही गाडी २० जून रोजी सुटणार आहे. तसेच गाडी क्र.१०१०६ सावंतवाडी रोड – दिवा एक्स्प्रेसला सावंतवाडी रोड – कणकवली विभागादरम्यान अर्ध्या तासासाठी थांबवण्यात येणार आहे. कोकण कन्या एक्सप्रेस व मांडवी एक्स्प्रेस याही गाड्या थांबवल्या जातील.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

 

Recent Posts

Ipl 2024: मुंबई इंडियन्सच्या नावावर या लाजिरवाण्या रेकॉर्डची नोंद

मुंबई: लखनऊ सुपर जायंट्सने मुंबई इंडियन्सला आयपीएल २०२४मधील(ipl 2024) ६७व्या सामन्यात हरवले. लखनऊने पहिल्यांदा फलंदाजी…

21 mins ago

३६५ दिवस चालणार Jioचा हा नवा प्लान, अनलिमिटेड कॉलिंगसोबत फ्री मिळणार FanCode

मुंबई: रिलायन्स जिओकडे(reliance jio) सध्या यावेळे ४६ कोटींपेक्षा अधिक लोकांचा कस्टमर बेस आहे आणि आता…

2 hours ago

सेकंड हँड मोबाईल खरेदी करताय तर घ्या ही काळजी, नाहीतर होईल मोठे नुकसान

मुंबई: स्मार्टफोन्सच्या किंमती बऱ्याच वाढल्या आहेत. आधी जो रेडमी नोट सीरिजमधील फोन १० ते १५…

2 hours ago

चालत्या बसमध्ये लागली आग, ८ जणांचा होरपळून मृत्यू

नूंs: नूंहमध्ये मोठा अपघात घडला आहे. येथे शुक्रवारी रात्री भक्तांनी भरलेल्या बसला अज्ञात कारणामुळे आग…

3 hours ago

मुंबईकरांच्या विकासाला कौल देणारी निवडणूक

सोमवारी २० मे रोजी मुंबई शहरातील सहा लोकसभा मतदारसंघांसाठी मतदान होणार आहे. सहा लोकसभा मतदारसंघांसाठी…

8 hours ago

होर्डिंग काळ बनून येतो तेव्हा…

विवेक वेलणकर: सामाजिक कार्यकर्ते प्रसिद्धीचे एक माध्यम म्हणून अवाढव्य होर्डिंग उभे करण्याचा पायंडा पडला आणि…

9 hours ago