बार्शीतील ‘फटे स्कॅम’ प्रकरणी विशाल फटेचे वडील आणि भाऊ ताब्यात

Share

बार्शीतील ‘फटे स्कॅम’ प्रकरणात पहिली अटक झाली आहे.  मुख्य आरोपी विशाल फटेचे वडील आणि भावाला पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे.  मुख्य आरोपी विशाल फटे याचे वडील अंबादास फटे, भाऊ वैभव फटे यांना पोलिसांनी पकडलं आहे. मध्यरात्री सांगोला येथून स्थानिक गुन्हे शाखेने या दोघांना ताब्यात घेतलं. कोट्यवधीच्या फसवणूक प्रकरणी विशाल फटेसोबत परिवारातील 4 सदस्य देखील आरोपी आहेत. त्यापैकी दोघे जण आता ताब्यात आले आहेत. मुख्य आरोपी विशाल फटे अद्यापही फरार आहे.

दीपक यांच्या फिर्यादीनंतर बार्शी शहर पोलिस ठाण्यात तक्रारींचा आता पाऊस पडतोय. गुन्हा दाखल होत असताना केवळ 6 लोकांनी यासंदर्भात तक्रार दिली होती. मात्र काल एका दिवसात आणखी 40 लोकांनी आपली फसवणूक झाल्याची तक्रार पोलिसात दिली आहे.

2019 साली फिर्यादी दीपक आंबरे हे विशाल याच्या नेट कॅफेमध्ये पीक विम्याचे फॉर्म भरण्यासाठी गेले होते. तिथे त्यांची ओळख विशाल सोबत झाली. नंतर ही मैत्री अधिक घट्ट होत गेली.
विशालने दीपक यांना शेअर मार्केटबद्दल सांगितले. आणि त्यांच्याकडून पहिल्यांदा 70 हजार रुपये घेतले. पहिल्याच महिन्यात 30 हजार रुपये वाढ करुन एक लाख रुपयांचा परतावा विशालने दीपक यांना दिला. यामुळे त्यांचा विश्वास वाढत गेला. दीपक यांनी स्वत: सह आपल्या परिवारातील सदस्यांचे, नातेवाईकांचे पैसे देखील विशालकडे गुंतवले. जवळपास 5 कोटी रुपयांची गुंतवणूक फिर्यादी दीपक यांनी विशालकडे केली होती. दीपक प्रमाणेच बार्शीतील अनेकांनी विशालकडे पैसे गुंतवलेले होते. मात्र 9 जानेवारी रोजी विशाल आपल्या परिवारासह पसार झाला आहे. त्याच्या शोधासाठी सोलापूर ग्रामीण दलाचे तीन ते चार पथक विविध ठिकाणी रवाना करण्यात आले आहे.

Recent Posts

राम मंदिरात जाण्यावरुन पक्षाचा विरोध; कॉंग्रेसच्या बड्या नेत्याचा राजीनामा…

श्रीराम मंदिरात गेल्यामुळे पक्षातून विरोध नवी दिल्ली ( वृत्तसंस्था): श्रीराम मंदिरात गेल्यामुळे पक्षातून विरोध होत…

12 mins ago

ICC Women’s T20 World Cup महिला टी-२० वर्ल्डकपचे वेळापत्रक जाहीर, पाहा कधी असणार भारताचे सामने

मुंबई: आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने महिला टी-२० वर्ल्डकपचे वेळापत्रक जाहीर केले आहे. यावेळेस महिला टी-२० वर्ल्डकप…

17 mins ago

खोके, पेट्यांवर जगणाऱ्यांनी खोक्यांची भाषा करू नये, नारायण राणेंचा उबाठावर हल्लाबोल…

सावंतवाडी (प्रतिनिधी) : सिंधुदुर्ग जिल्ह्यात माझा जन्म झाला, पण माझा कार्यक्षेत्र मुंबई होते. बाळासाहेबांनी मला…

31 mins ago

PBKS vs CSK : पंजाबचा विजयी सिक्सर हुकला, चेन्नईने २८ धावांनी चारली पराभवाची धूळ

मुंबई: पंजाब किंग्स(punjab kings) आणि चेन्नई सुपर किंग्स(chennai super kings) यांच्यात आयपीएल २०२४चा(ipl 2024) ५३वा…

1 hour ago

Jason Holton : ब्रिटनमधील सर्वात वजनदार व्यक्तीचा वयाच्या ३३ व्या वर्षी मृत्यू!

तब्बल ३१८ किलो वजन; अतिरिक्त चरबीमुळे अवयव झाले निकामी लंडन : ब्रिटनमधील सर्वात वजनदार माणूस…

4 hours ago

Chandrashekhar Bawankule : याकुबच्या कबर सुशोभिकरणानंतर आता काँग्रेसला कसाबचा पुळका!

वडेट्टीवारांची भूमिका पाकिस्तान धार्जिणी; भाजपला विरोध म्हणून दहशतवाद्यांसाठी अश्रू गाळतायत चंद्रशेखर बावनकुळे यांचा जोरदार पलटवार…

4 hours ago