Viral Story : वाह रे चोरा! लॅपटॉप चोरला आणि महत्त्वाची फाईल मेल केली

Share

मुंबई : लॅपटॉप चोरल्यानंतर त्या चोराने मालकाची माफी मागणारा ईमेल पाठवला आहे. ज्यात चोराने म्हटले आहे की, त्याला पैशाची गरज होती. आणखी कोणती फाईल हवी असल्यास मला मेल करा, असे आवाहनही चोराने केले आहे. लॅपटॉप मालकाने या ई-मेलचा स्क्रीनशॉट ट्विटरवर शेअर केला आहे, जो प्रचंड व्हायरल झाला आहे.

चोराने केलेल्या मेलमध्ये म्हटले आहे की, ‘कसा आहेस भावा..? मला पैशाची गरज होती. माझ्या गरजा पूर्ण करण्यासाठी मी खूप धडपडत होतो. त्यामुळे मी काल तुझा लॅपटॉप चोरला. त्याबद्दल मला माफ कर. तसेच चोराने लॅपटॉपच्या मालकाला एक महत्त्वाची फाइलही पाठवली आहे. त्यावर तो असा म्हणत आहे की, ‘मी पाहिले की तुम्ही एका रिसर्चवर काम करत आहात. ती फाईल मी या ई-मेल सोबत जोडली आहे. तुम्हाला दुसरी आणखी कोणती फाईल हवी असल्यास मला सोमवारी दुपारी १२ वाजण्याच्या आत मेल करा. कारण मला लॅपटॉप खरेदी करणारा व्यक्ती भेटला असून मी तो विकणार आहे.

या पोस्टला आतापर्यंत २ लाख ८२ हजारांहून अधिक लोकांनी लाईक केले आहे. तर सुमारे ३९ हजार ६०० लोकांनी रिट्विट केले आहे. यामध्ये काही नेटीझन्सनी त्या चोराला नोकरी द्यावी, तर काहींनी लॅपटॉपच्या बदली त्याला पैसे ऑफर करा, असा सल्ला लॅपटॉप मालकाला दिला आहे.

Recent Posts

JEE Advanced परिक्षेसाठी आज मिळणार प्रवेशपत्र!

जाणून घ्या प्रवेशपत्र डाऊनलोड करण्याची संपूर्ण प्रक्रिया चेन्नई : JEE Advanced 2024 म्हणजेच, संयुक्त प्रवेश…

43 mins ago

Weather Update : उन्हाचा चटका कमी होणार! महाराष्ट्रात वादळी पावसाचा इशारा कायम

'या' जिल्ह्यांना यलो अलर्ट मुंबई : राज्यात अनेक ठिकाणी अवकाळी पावसाने (Unseasonal Rain) हजेरी लावली…

1 hour ago

HSC आणि SSC बोर्डाच्या परिक्षांच्या निकालासंदर्भात मोठी अपडेट!

कधी जाहीर होणार निकाल? मुंबई : केंद्रीय माध्यमिक परीक्षा मंडळ म्हणजेच CBSE बोर्डाच्या दहावी आणि…

1 hour ago

Singapore News : कंपनी झाली मालामाल! बोनस म्हणून कर्मचाऱ्यांच्या हाती चक्क ८ महिन्यांचा पगार

जाणून घ्या नेमकं कसं उजळलं कर्मचाऱ्यांचं नशीब सिंगापूर : साधारणत: कंपन्यांकडून सणासुदीला किंवा नवीन वर्षाच्या…

2 hours ago

Amit Shah : पराभव झाल्यास भाजपाला ‘प्लॅन बी’ची गरज? काय म्हणाले अमित शाह?

नवी दिल्ली : लोकसभा निवडणुकीमध्ये (Loksabha Election) प्रत्येक राजकीय पक्ष आपल्या विजयासाठी जोरदार तयारी करत…

2 hours ago

Chandrashekhar Bawankule : भगव्या ध्वजाला फडकं म्हणणं हा उद्धव ठाकरेंचा नतद्रष्टेपणा!

सोनिया सेनेची गुलामी करण्यासाठी उद्धव ठाकरेंनी भगव्याचा अवमान केला चंद्रशेखर बावनकुळे यांचा घणाघात मुंबई :…

3 hours ago