मुंबई-गोवा दरम्यान ‘वंदे भारत एक्सप्रेस’ सुरू होणार

Share

मुंबई : मुंबई-गोवा रेल्वेमार्गावर विद्युतीकरणाची कामे अंतिम टप्प्यात असून, कामे पूर्ण झाल्यानंतर मुंबई-गोवा वंदे भारत एक्सप्रेस सुरू करण्यात येईल, असे आश्वासन रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी आज येथे दिल्याची माहिती भाजपाचे आमदार निरंजन डावखरे यांनी दिली.

कोकणासह ठाणे जिल्ह्यातील रेल्वेच्या विविध प्रश्नांसंदर्भात रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे-पाटील यांची मुंबईत भाजपाच्या आमदारांनी भेट घेतली. यामध्ये प्रविण दरेकर, निरंजन डावखरे, गणपत गायकवाड, प्रसाद लाड आदींचा समावेश होता. त्यावेळी त्यांनी कोकणातील प्रवाशांसाठीचे विविध मुद्दे मांडले.

कोकणातील प्रवाशांचा प्रवास वेगाने होण्यासाठी शिर्डी व सोलापूरप्रमाणेच गोव्यापर्यंत वंदे भारत एक्सप्रेस सुरू करावी, अशी आग्रही मागणी आमदारांनी केली. त्यावेळी रेल्वेमार्गाचे विद्युतीकरण पूर्ण झाल्यावर वंदे भारत एक्सप्रेस सुरू करण्याचे आश्वासन राज्यमंत्री दानवे यांनी दिले.

‘वन प्रॉडक्ट, वन स्टॉल’ प्रकल्पानुसार कोकण रेल्वेतील प्रकल्पग्रस्त व्यक्ती वा त्यांच्या वारसांना स्टॉल द्यावेत, शेतकऱ्यांसाठी प्रत्येक स्थानकात फिरता स्टॉल असावा, कोकण रेल्वेमार्गावरील सर्व स्थानकांतील प्लॅटफॉर्म व गाडीमधील उंची समान ठेवावी, रेल्वे पुलामुळे महाड येथे पूरस्थिती निर्माण होत असल्याबद्दल उपाययोजना करावी, सावंतवाडी-दिवा ट्रेन दादरपर्यंत न्यावी, रेल्वेमार्गालगत रेल्वेच्या जागेवर वसलेल्या घरांमधील रहिवाशांचे एसआरए प्रकल्पात पुनर्वसन करण्यासाठी रेल्वे जमिनीचा एफएसआय द्यावा, कोकणातील लोटे परशुरामसह विविध एमआयडीसी ते रेल्वेस्थानकापर्यंत लाईनसाठी प्रस्ताव तयार करावा, वीर ते रानवाडी स्थानकापर्यंत दुहेरीकरण करावे, जनशताब्दी, तेजस आणि गरीब रथ गाड्यांना खेड रेल्वे स्थानकाचा थांबा द्यावा, आदी मागण्या रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांच्याकडे करण्यात आल्या. त्यावर त्यांनी सकारात्मक कार्यवाही करण्याचे आश्वासन दिले.

Recent Posts

Mumbai crime : धक्कादायक! ऑनलाईन ऑर्डर केलेल्या आईस्क्रिममध्ये आढळलं माणसाचं तुटलेलं बोट!

मुंबईच्या मालाडमधील खळबळजनक घटना मुंबई : ऑनलाईन ऑर्डर (Online order) केलेल्या पदार्थांमध्ये भेसळ असणे, किंवा…

29 mins ago

Mumbi Local : मध्य रेल्वेवर नेमके चाललंय काय! वाहतुकीचा खेळखंडोबा सुरुच

प्रवाशांचा प्रशासनावर तीव्र संताप मुंबई : मध्य रेल्वेने (Central Railway) घेतलेल्या तीन दिवसीय मेगाब्लॉक (Megablock)…

55 mins ago

WI vs NZ: वेस्ट इंडिजचा न्यूझीलंडवर धमाकेदार विजय

मुंबई: टी-२० वर्ल्डकप २०२४च्या(t-20 world cup 2024) २६व्या सामन्यात वेस्ट इंडिजने न्यूझीलंडवर धमाकेदार १३ धावांनी…

2 hours ago

PM Modi: कुवैत आग प्रकरणी पंतप्रधान मोदींनी व्यक्त केला शोक, २ लाख रूपये मदतीची घोषणा

नवी दिल्ली: कुवैत येथे झालेल्या भीषण अग्नितांडवात तब्बल ४९ लोकांचा होरपळून मृत्यू झाला. यात ३०…

3 hours ago

BOB Jobs: बँक ऑफ बडोदामध्ये बंपर भरती, या तारखेआधी करा अप्लाय

मुंबई: बँकेत नोकरी शोधत आहात तर ही बातमी तुमच्यासाठी आहे. बँक ऑफ बडोदाकडून अनेक पदांसाठी…

4 hours ago

T-20 world cup 2024: भारताच्या विजयाने पाकिस्तानला झाला आनंद

मुंबई: रोहित शर्माच्या नेतृत्वात भारतीय संघाने धमाकेदार कामगिरी केली आणि टी-२० वर्ल्डकप २०२४च्या(t-20 world cup…

5 hours ago