Tuesday, June 18, 2024
Homeताज्या घडामोडीउद्धव ठाकरे यांनी स्वतःचा इमान, स्वाभिमान पाकिस्तानच्या झेंड्यासमोर गहाण ठेवला

उद्धव ठाकरे यांनी स्वतःचा इमान, स्वाभिमान पाकिस्तानच्या झेंड्यासमोर गहाण ठेवला

आमदार नितेश राणे यांचा घणाघात

कणकवली : वैष्णोदेवी दर्शनाला जाणाऱ्या भक्तांच्या बस गाडीवर दहशतवादी हल्ला झाला. आजपर्यंत १८ वैष्णोदेवी भक्तांनी या हल्ल्यात प्राण गमावले. आज हिंदुहृदयसम्राट स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे असते तर अशा दहशतवाद्यांना थेटच इशारा दिला असता. बाळासाहेब हे मुंबईत बसून पाकिस्तान हादरवून सोडण्याची धमक असलेले नेते होते. मात्र आताची उबाठा आणि त्यांचे नेते, प्रवक्ते हे राजकारणापलीकडे काहीच बोलत नाही. दहशतवाद्यांना अद्दल घडवू असे बोलण्याची त्यांच्यात हिम्मत नाही. कारण पाकिस्तानच्या घोषणा देणारे आणि पाकिस्तानचे झेंडे फडकविणारे उद्धव ठाकरे यांचे नऊ खासदार निवडून देणारे आहेत. उबाठाचे नेते आणि उद्धव ठाकरे यांनी स्वतःचा इमान, स्वाभिमान पाकिस्तानच्या झेंड्यासमोर गहाण ठेवला आहे. त्यामुळे स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांचे नाव घेण्यापूर्वी त्यांचे विचार आत्मसात करा, अशी टीका भाजप प्रवक्ते आमदार नितेश राणे यांनी केली आहे.

आमच्या हिंदूंवर अतिरेकी हल्ले होत असतील तर पाकिस्तानचे झेंडे फडकवणाऱ्यावर आम्ही कारवाई करू असं राऊत बोलेल का? ते बोलणार नाहीत, मात्र त्यांना चोख उत्तर नरेंद्र मोदी, अमित शहा देतील, असा विश्वास यावेळी आमदार नितेश राणे यांनी दिला.

उबाठाला महाविकास आघाडीत किती दिवस ठेवायचं हे आम्ही ठरवू अशी धमकीच काँग्रेसने दिल्लीवरून दिली आहे. मात्र हिम्मत असेल तर मुंबई पदवीधरची जगा लढवा. काँग्रेसला कोकण पदवीधर मतदार संघ दिला आहे कारण उबाठाला आपले कोकणातील अस्तित्व संपले हे माहीत आहे.

३७० कलम हटविले. त्यामुळे काश्मीरमध्ये किती शांतता आहे हे संजय राऊत यांनी स्वतःच्या कुटुंबासोबत जाऊन बघावे. आता त्याठिकाणी उरलेल्या चार अतिरेकी टाळक्यांना पंतप्रधान मोदी या वेळी धडा शिकवतील. रोज सकाळी ४२० असलेल्या भ्रष्टाचारी संजय राऊत या माणसाला उद्धव ठाकरेंनी महाराष्ट्राच्या माथी मारलेला आहे. त्याला आधी थांबवा, अशी टीका संजय राऊत यांच्यावर केली. पालतू कुत्र्या प्रमाणे तुझ्या मालकाला वापरलं जातंय त्यावर बोल. मागच्या दरवाजातून येणाऱ्यांना निवडणूक कधीच कळणार नाही.

३० ते ३१ जागा पाकिस्तानचा झेंडा फडकवून जिंकलेल्या आहेत, याचा जल्लोष पाकमध्ये जास्त झाला. उद्धव ठाकरेचा नागरी सत्कार पाकिस्तानमध्ये होईल. याचे नवल वाटायला नको. सर्वात मोठा हप्तेखोर संजय राऊत आणि त्याचा मालक आहे. त्यांनी दुसऱ्यांना हप्तेखोर बोलू नये, असे ते म्हणाले.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

- Advertisment -