सदावर्तेंच्या पोलीस कोठडीत आणखी दोन दिवसांची वाढ

Share

मुंबई : संपकरी एसटी कर्मचाऱ्यांना भडकवल्याप्रकरणी आणि सरकारी कामात अडथळा निर्माण केल्याप्रकरणी पोलीस कोठडीत असलेल्या अॅड गुणरत्न सदावर्ते यांच्या पोलीस कोठडीत आणखी दोन दिवसांची वाढ करण्यात आली आहे.
राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्या घरावर झालेल्या हल्ल्या प्रकरणी अॅड गुणरत्न सदावर्ते यांना किल्ला कोर्टाने दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली होती. तो कालावधी आज संपल्याने सदावर्ते यांना गिरगाव कोर्टात हजर करण्यात आले असता कोर्टाने सदावर्तेंना आणखी दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.

मुंबई पोलिसांच्या वतीने सरकारी वकील अॅड प्रदीप घरत यांनी योरदार युक्तीवाद करत तपास प्राथमिक टप्प्यात असल्याने पोलिस कोठडी आवश्यक असल्याचे सांगत सदावर्तेंच्या विरोधात पोलिसांकडे सबळ पुरावे आहेत. पोलिस कोठडीच्या दोन दिवसांत त्यांची चौकशी केली गेली आहे. पण दोन दिवसांचा कालावधी हा चौकशीसाठी पुरेसा नाही. ‘कुछ बातें हो चुकी है, कुछ बातें अभी है बाकी’, अशी परिस्थिती असल्याने सदावर्तेंना आणखी ११ दिवसांची पोलिस कोठडी मिळावी, अशी मागणी केली होती. न्यायालयाने सरकारी पक्ष आणि बचाव पक्षाचे युक्तीवाद ऐकल्यानंतर सदावर्तेंना आणखी २ दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे.

एसटी कर्मचाऱ्यांचे वकील गुणरत्न सदावर्ते यांच्यावर कर्मचाऱ्यांना भडकावल्याचा आरोप ठेवण्यात आला असून, ही कारवाई रोषातून सुरू असल्याचे सदावर्तेंच्या वकिलांनी किल्ला कोर्टाता बाजू मांडताना म्हटले होते.

Recent Posts

Heatwave in India : देशभरात उष्णतेची लाट; तापमान ४५ अंशांपर्यंत पोहोचणार! तर काही भागात मुसळधार!

नवी दिल्ली : भारतीय हवामान विभागाने (IMD) आज देशाच्या अनेक भागांमध्ये उष्णतेच्या तीव्र लाटेचा इशारा…

1 hour ago

उद्धव ठाकरे डरपोक, पराभव दिसू लागल्याने डोक्यावर परिणाम झाल्यामुळे निराधार आरोप; आशिष शेलारांचे टीकास्त्र

आधी त्यांनी ईव्हीएम मशीनच्या नावाने बोंबा ठोकल्या मग मतांच्या टक्केवारीवर प्रश्नचिन्ह उभे केले आता बोटाच्या…

2 hours ago

Sanjay Raut : पंतप्रधान मोदींबाबत आक्षेपार्ह वक्तव्याप्रकरणी संजय राऊतांविरोधात गुन्हा दाखल!

ऐन निवडणुकीच्या काळात राऊतांना 'ते' वक्तव्य चांगलंच भोवणार मुंबई : ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत…

5 hours ago

Accident news : चारधामसाठी निघालेल्या भाविकांच्या ट्रॅव्हल्सने पेट घेतला अन्…

बुलढाणा बस दुर्घटनेची पुनरावृत्ती होता होता वाचली! बुलढाणा : गतवर्षी जून महिन्यात बुलढाणा येथे एक…

5 hours ago

Mihir kotecha : लोकसभेच्या गेटबाहेर गुटखा विकणारा खासदार पाठवायचाय की तुमचा सेवक पाठवायचाय?

कालच्या राड्याप्रकरणी मिहिर कोटेचा यांचा मुंबईकरांना सवाल मविआच्या २५-३० कार्यकर्त्यांवर गुन्हा दाखल; ५ जण पोलिसांच्या…

6 hours ago

Kolhapur news : मुलाला वाचवताना तिघांचा नदीत बुडून मृत्यू! कोल्हापुरात घडली भीषण दुर्घटना

हसन मुश्रीफांनी घटनेची दखल घेत तातडीने आर्थिक मदत करण्याच्या दिल्या सूचना कोल्हापूर : कोल्हापुरातून (Kolhapur)…

7 hours ago