एक रुपयात चहा, दोन रुपयात समोस्यासाठी खवय्यांची उसळली गर्दी

Share

अर्धा किलोमीटरपर्यंत लागली रांग

प्रमोद दंडगव्हाळ

सिडको : आजही बाजारात एखादी कोणती नवी वस्तू अथवा स्किम आली की, ग्राहक त्यामागे सैरावैरा धावताना दिसतात. असेच काहीसे विदारक चित्र सिडकोत बघायला मिळाले. उत्तम नगर येथे नुकताच एका नवीन दुकानाचा शुभारंभ झाला. त्यांनी एका रुपयात चहा तर दोन रुपयात समोसा ही योजना सुरु केली. त्याचा आस्वाद घेण्यासाठी खवय्यांनी तोबा गर्दी केली. ही गर्दी इतकी मोठी होती की सलग दोन ते तीन दिवस ग्राहकांना अक्षरशः अर्धा किलोमीटर पर्यंत रांग लावावी लागल्याचे चित्र बघायला मिळाले.

उत्तम नगर येथे नुकतेच समोस्याचे एक नवीन दुकान सुरू झाले आहे. या दुकानातील समोस्याची चव ग्राहकांना चवीने चाखता यावी व त्यांनी आपल्याकडे नेहमी यावे याकरिता दुकानदाराने ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी एक चांगली स्कीम आखली. सुरुवातीला एका रुपयात चहा व दोन रुपयात समोसा देण्याच्या त्यांच्या या योजनेला ग्राहकांचा उदंड प्रतिसाद लाभला.

कामगार वसाहत म्हणून सिडको परिसर ओळखला जातो. त्यामुळे हातावर पोट भरणाऱ्यांची संख्या येथे मोठ्या प्रमाणात आहे. चहा व समोस्याला मागणी आहे. त्यामुळे जेव्हा भर वसाहतीत असलेल्या दुकानांमध्ये केवळ एका रुपयात चहा व दोन रुपयात समोसा मिळतो. अशी भनक ग्राहकांना लागली. तेव्हा त्यांनी तोबा गर्दी केल्याचे बघायला मिळाले. ही रांग का लागली आहे. अशी विचारपूस आजूबाजूचे लोक मोठ्या कुतूहलाने करू लागले. जेव्हा त्यांना देखील हा फंडा कळाला. तेव्हा ते देखील या योजनेचा आस्वाद घेण्यासाठी सामील झाले. मग काय, एक-एक करून ही गर्दी एवढी वाढली की रस्त्यावर वाहतूक खोळंबली.

काहीही असो, स्वस्तात मस्त असलेल्या या स्कीमला दाद देणे हे ग्राहकांचे आद्य कर्तव्यच असते. असे बोल यावेळी ऐकायला मिळाले. असे म्हणून की काय सर्वांनी एक कप चहा व समोसा याचा मोठा आस्वाद घेतल्याचे बघायला मिळाले. चहाची व समोस्याची चव चाखल्यानंतर या दुकानात आजही गर्दी बघायला मिळतेय. ही एक विशेष बाबच म्हणावी लागेल. त्यामुळे दुकानदाराला ही स्कीम चांगलीच पावली. परंतू याचा इतर खाद्य पदार्थांच्या दुकानांवर चांगलाच परिणाम झाल्याचे बघायला मिळाले. ग्राहक “अतिथी देवो भव” या उक्ती प्रमाणे दुकानदाराने ग्राहकांना आकर्षित करण्याचा केलेला हा “जुगाड” सध्या सर्वत्र चर्चिला जात आहे.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

 

Recent Posts

IPL 2024: प्लेऑफचे सामने कुठे आणि कधी रंगणार? कोणत्या संघामध्ये होणार सामना घ्या जाणून

मुंबई: राजस्थान रॉयल्स आणि कोलकाता नाईट रायडर्स यांच्यातील सामना रद्द होण्यासोबतच आयपीएलच्या लीग सामन्यांची सांगता…

5 mins ago

Lok Sabha Election 2024: लोकसभेच्या पाचव्या टप्प्यातील मतदानाला सुरूवात, अनेक दिग्गज मैदानात

मुंबई: लोकसभा निवडणूक २०२४च्या पाचव्या टप्प्यात आठ राज्यातील ४९ जागांवर आज मतदान होत आहे. सकाळी…

1 hour ago

‘आरटीई’अंतर्गत शाळा प्रवेशाची प्रक्रिया मुंबईत सुरू

मुंबई : शैक्षणिक वर्ष २०२४-२०२५ साठी ‘शिक्षण हक्क अधिनियम’ अर्थात ‘आरटीई’अंतर्गत २५ टक्के आरक्षित जागांसाठीच्या…

15 hours ago

मलाच मुख्यमंत्री बनवा अन्यथा मातोश्रीतले बिंग फोडेन!

संजय राऊत यांनाच मुख्यमंत्री व्हायचे होते, त्यासाठी उद्धव ठाकरेंना ब्लॅकमेल केल्याचा आमदार नितेश राणे यांचा…

15 hours ago

Lok Sabha Election : राहुल गांधी आणि अखिलेश यादव यांच्या सभेत चेंगराचेंगरी

दोन्ही नेते भाषण न करता निघून गेले फुलपूर : लोकसभा निवडणुकीच्या (Lok Sabha Election) पार्श्वभूमीवर…

16 hours ago

Cloudburst : अरे बाप रे! मे महिन्यात इतका पाऊस कसा झाला? हवामान विभागालाही पडला प्रश्न

चिपळूणात ढगफुटी, अडरे गावात अर्ध्या तासात रेकॉर्डब्रेक पाऊस, नद्या दुथडी भरुन वाहू लागल्या चिपळूण :…

16 hours ago