स्विपर ट्रक ठरला आहे पांढरा हत्ती

Share

कर्जत  : कर्जत नगरपरिषद हद्दीतील सिमेंट क्रॉक्रिटच्या रस्त्यांवरील पडलेला कचरा उचलण्यासाठी सन २०१९ मध्ये तब्बल ४७ लाख ३७ हजार रुपये खर्च करून स्विपर ट्रकची खरेदी करण्यात आली. मात्र ती खरेदी करताना कर्जत शहरातील रस्त्यांसाठी तो ट्रक किती प्रभावी ठरेल. तसेच ट्रक चालवण्यासाठी डिझेल आणि प्रशिक्षित वाहन चालकावर किती खर्च येईल, याचा ठोकताळा न घेतल्याने आजच्या घडीला हा स्विपर ट्रक नगर परिषदेसाठी पांढरा हत्ती ठरला आहे, असा कर्जतकर करत आहेत.

स्विपर ट्रक चालवण्यासाठी विशेष प्रशिक्षित वाहन चालकाची गरज भासते. तसा चालक कर्जत नगरपरिषदेकडे सध्या उपलब्ध नाही. तसेच, आठवड्यातील फक्त तीन दिवस शहरात गाडी फिरवायची म्हटली तरी तब्बल १८ हजारांचे डिझेल लागते. खेदाची बाब म्हणजे एवढा खर्च करूनही या गाडीने कचरा उचललाच जात नाही, हे विदारक सत्य आहे. त्यामुळे ही गाडी नगर परिषदेने खरेदी केल्यापासून कित्येक महिने एकाच जागेवर धूळखात उभी असल्याचे नागरिकांना दिसून येते. त्यामुळे कर्जत नगरपरिषदेने जनतेच्या पैशांतून स्विपर ट्रक खरेदी करण्याचा घेतलेला निर्णय नक्कीच फायदेशीर ठरला नाही, असा आरोप नागरिक करत असून यामुळे नागरिकांमध्ये प्रचंड नाराजी आहे.

एकीकडे दररोज कचरा उचलणाऱ्या घंटा गाड्यांची अवस्था फारशी चांगली नसून काही गाड्यांना तर धक्का मारायची वेळ कर्मचाऱ्यांवर येते. त्यामुळे खरे तर कर्जत नगरपरिषदेने नवीन स्विपर ट्रक खरेदी करण्यासाठी घातलेला घाट कितपत योग्य होता, असा सवाल नागरिकांमधून होत आहे.

गाडी खरेदी करून साध्य काय झाले?

मुळातच शहरातील काही प्रभागांमधील रस्ते अरुंद आहेत. तेथे हा स्विपर ट्रक मोठा असल्याने अंर्तगत रस्त्यांमध्ये घुसतसुद्धा नाही. तसेच, हा स्विपर ट्रक चालवण्याचे चालकाला प्रशिक्षण नसल्याने रस्त्यावरील कचरा साफ करण्याऐवजी गोल फिरणाऱ्या ब्रशचा रस्त्यावर जास्त दबाव पडत असल्याने रस्त्यालाच बाधा पोहोचण्याची शक्यता जास्त आहे. त्यामुळे नगरपरिषदेने ही गाडी खरेदी करून नक्की काय साध्य केले, असा प्रश्न आता नागरिकांमधून उपस्थित केला जात आहे.

निधी व्यर्थ गेला – अमोघ कुलकर्णी, आरटीआय कार्यकर्ता

नगर परिषदेने स्विपर ट्रक खरेदीचा घाईगडबडीत घेतलेला निर्णय चुकीचा असून या गाडीचा रस्ते साफसफाईसाठी अपेक्षित उपयोगच होत नाही. त्यामुळे हा निधी व्यर्थ गेला असून अन्य कामांसाठी खर्च केलेला परवडला असता. – अमोघ कुलकर्णी, आरटीआय कार्यकर्ता

ट्रक म्हणजे शोभेची वस्तू – राजेश लाड, माजी नगराध्यक्ष कर्जत न. प.

कर्जत नगरपरिषदेने दैनंदिन रस्त्यांवरील कचरा उचलण्यासाठी स्वयंचलित मशिनरी आणताना त्याबाबतची शहनिशा तथा परिपूर्ण माहिती घ्यायला पाहिजे होती. आता या स्विपर ट्रकचा काहीच उपयोग होत नसून हा ट्रक म्हणजे शोभेची वस्तू ठरला आहे . – राजेश लाड, माजी नगराध्यक्ष कर्जत न. प.

जनतेचा पैशाचा अपव्यय – उमेश गायकवाड, नगरसेवक, कर्जत न. प.

स्विपर ट्रक खरेदी करताना आम्हा नगरसेवकांना विचारात घेतले नव्हते. या गाडीचा उपयोग होत नसल्याने जनतेचा पैशाचा अपव्यय झाला आहे. – उमेश गायकवाड, नगरसेवक, कर्जत न. प.

Recent Posts

१००१ दिवसांच्या गुंतवणुकीवर ९टक्के व्याज, ही बँक देत आहे FDवर बेस्ट ऑफर

मुंबई: सुरक्षित गुंतवणूक आणि जोरदार रिटर्नच्या बाबतीत काही काळापासून फिक्स डिपॉझिट स्कीम्सला अधिक लोक अधिक…

25 mins ago

Success Mantra: कठीण परिस्थितींमध्येही असे राहा शांत आणि सकारात्मक

मुंबई: प्रत्येक व्यक्तीला आपल्या आयुष्यात यशस्वी व्हायचे असते. अनेकदा लोक आपले लक्ष्य मिळवण्यासाठी खूप प्रयत्न…

1 hour ago

Lost Phone Track: या ट्रिकने सहज शोधू शकता हरवलेला फोन

मुंबई: मोबाईल फोन(mobile phone) आपल्या जीवनातील महत्त्वाचा भाग बनत चालला आहे. याशिवाय आपले आयुष्यच हल्ली…

3 hours ago

Daily horoscope: दैनंदिन राशीभविष्य, सोमवार, दि. ०६ मे २०२४.

पंचांग आज मिती चैत्र कृष्ण त्रयोदशी शके १९४६, चंद्र नक्षत्र रेवती. योग प्रीती. चंद्र राशी…

5 hours ago

राणेंच्या झंझावाताने उबाठा सेनेला कापरे…

कोकणात रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघात मंगळवारी ७ मे रोजी मतदान आहे. गेले दीड महिना भाजपाचे उमेदवार…

8 hours ago

नारायण राणे यांना मत म्हणजे नरेंद्र मोदींना मत!

अरुण बेतकेकर (माजी सरचिटणीस स्थानीय लोकाधिकार समिती महासंघ, संलग्न शिवसेना) अठराव्या लोकसभेच्या ५४३ सदस्यांना निवडण्यासाठी,…

8 hours ago