रिफायनरी संदर्भातील आंदोलनकर्त्यांना बजावलेले मनाई आदेश प्रशासनाकडून रद्द

Share

रत्नागिरी (प्रतिनिधी) : जिल्हाधिकारी तथा जिल्हादंडाधिकारी रत्नागिरी एम. देवेंदर सिंह यांनी जारी केलेल्या मनाई आदेशान्वये रिफायनरी प्रकल्पासंदर्भातील काही आंदोलनकर्त्यांना रत्नागिरी जिल्ह्यामध्ये प्रवेश करण्यास व संचार करण्यास फौजदारी प्रक्रिया संहिता अन्वये मनाई आदेश जारी करण्यात आला होता. हे जारी केलेले आदेश क्र. जिविशा/रिफायनरी प्रकल्प/ ३२४५ – ३२५० / २०२३ पोलीस अधीक्षक, रत्नागिरी धनंजय कुलकर्णी यांच्या११ मे पत्राच्या आनुषंगाने मागे घेण्यात आले आहेत, अशी माहिती जिल्हा प्रशासनाने दिली आहे.

ज्या व्यक्तींना मनाई आदेश जारी करण्यात आले होते व हे आदेश आता रद्द करण्यात आले, त्या संबंधित व्यक्तींची नावे व पत्ता- १) देवाप्पा अण्णा शेट्टी उर्फ राजू शेट्टी, रा. अर्जुनवाड रोड, ता.शिरोळ जि. कोल्हापूर, खासदार व अध्यक्ष स्वाभिमानी शेतकरी संघटना, २) जनार्दन पाटील, रा.परीते, ता. करवीर, जि. कोल्हापूर, ३) अशोक केशव वालम, रा. नाणार, ता. राजापूर, जि.रत्नागिरी ४) जालिंदर पाटील, रा. राशिवडे बुद्रुक, जि. कोल्हापूर, ५) स्वप्नील सोगम, रा. पन्हळेतर्फे राजापूर, ता. राजापूर जि. रत्नागिरी, ६) सत्यजित विश्वनाथ चव्हाण, रा.राम आनंद नगर हौसिंग सोसायटी, दहिसर पूर्व, मुंबई. संबंधित आदेश निवासी उपजिल्हाधिकारी तथा अपर जिल्हादंडाधिकारी चंद्रकांत सूर्यवंशी यांनी रद्द केले आहेत.

Recent Posts

Save water : पाणी

कथा : रमेश तांबे एप्रिल-मे महिन्यात सगळीकडेच पाणीटंचाईची भीषण समस्या असते. यावेळी जंगलातील प्राणी-पक्षी पाण्यावाचून…

1 min ago

Colourful Stars : रंगीत तारे

कथा : प्रा. देवबा पाटील यशश्रीचे विज्ञानाचे ज्ञान बघून, परीला खूप आनंद होत होता. तीही…

5 mins ago

Poems and riddles : अद्दल घडली कविता आणि काव्यकोडी

अद्दल घडली खरंच सांगतो दोस्तांनो एकदा काय घडलं आभाळातून पावसाला मी खाली ओढून आणलं म्हटलं…

17 mins ago

मुंबई, ठाणे, कल्याणसह नाशिकमध्ये उद्या मतदान

प्रचाराचा थंडावल्या तोफा, आता मतदारांच्या कौलाची प्रतिक्षा मुंबई : देशात लोकसभा निवडणूक सात टप्प्यात होणार…

2 hours ago

परमछाया…

माेरपीस: पूजा काळे अश्मयुगीन किंवा त्याहीपेक्षा अतिप्राचीन काळापासून मनुष्य जन्माचं कोडं अघटित, अचंबित करणारं आहे.…

3 hours ago

कर्करोगाला हरवून ४०० कोटी रुपयांची कंपनी सुरू करणारी कनिका

दी लेडी बॉस: अर्चना सोंडे वयाच्या २३ व्या वर्षी तिला कर्करोग झाला. मात्र तिने हिंमतीने…

3 hours ago