कुंटूंब रंगलेय बारावीच्या यशात

Share

सुनील बोडके

वाळुंज (त्र्यंबकेश्वर) : मागील दोन वर्षापासून कोरोनाने शाळा, कॉलेज तसेच ग्रामीण भागात अनेक अडचणीमुळे शिक्षणाचा बोजवारा उडाला असताना त्याच ग्रामीण भागातून दिलासा देणारी बातमी समोर आली आहे. त्र्यंबकेश्वर तालुक्यातील आव्हाटे येथील एकाच घरातील देहाडे कुटुंबायांनी मात्र इयत्ता बारावीच्या परीक्षेत घवघवीत यश संपादन केले आहे.

म्हणतात ना माणूस आपल्या आयुष्यात शेवटपर्यंत विद्यार्थी असतो, त्याचप्रमाणे देहाडे कुटूंबातील कुटुंब प्रमुख लक्ष्मण मुरलीधर देहाडे (वय वर्ष ४५) यांनी आपले राहिलेले शिक्षण पूर्ण करत इयत्ता १२ वीच्या परीक्षेला बसण्याचा निर्णय घेतला व ६४ टक्के गुण मिळवत तालुक्यात आदर्श घालून दिला आहे, त्याचबरोबर मोठी सून वृत्तिका ६४ टक्के व लहान मुलगा समीर ५५ टक्के गुण मिळवले आहे.

देहाडे कुटुंबियांच्या या यशाने सर्व स्तरातून त्यांचे कौतुक व शिक्षणा विषयी त्यांची गोडी या बदल अभिनंदन केले, यात तिघांनी मिळून एकत्र अभ्यास, चर्चा करून परीक्षा दिली आणि मोठे यश संपादन केले, यावेळी त्यांना मोलाची साथ दिली ती घरातील अन्य सदस्य मुलगा तुषार लक्ष्मण देहाडे, तसेच पत्नी विमल लक्ष्मण देहाडे यांनी या यशात सर्वांचा मोलाचा वाटा असल्याची लक्ष्मण देहाडे सांगतात.

परिस्थिती मुळे अर्धवट राहिलेले शिक्षण पूर्ण करण्याची संधी मिळाली कुटुंबियाणी मोलाची साथ देत यशाचा मार्ग सुकर केला, समाजाला शिक्षणा शिवाय पर्याय नाही, शिक्षण हे वाघिणीचे दूध आहे असे म्हणतात ते उगाच नाही, अजूनही पुढील शिक्षण घेण्याची इच्छा आहे. – लक्ष्मण देहाडे

Recent Posts

Hindu temples : मुंबईतील प्राचीन मंदिर बाबुलनाथ

कोकणी बाणा : सतीश पाटणकर मुंबई शहरात अनेक पर्यटन स्थळे, प्राचीन, प्रसिद्ध मंदिरांचा वारसा लाभला…

1 hour ago

प्रेमकहाणी भाग-१

नक्षत्रांचे देणे : डॉ. विजया वाड प्रेमकहाणी या लेखामधून दोन प्रेमी जीवांची झालेली ताटातूट, तरी…

1 hour ago

Drought : डोळे उघड माणसा…

विशेष : लता गुठे रस्त्याच्या दोन्ही बाजूला असलेली झाडे आणि त्यांच्या एकमेकांमध्ये गेलेल्या फांद्या यामुळे…

1 hour ago

Mahabharat : महाभारत युद्धातील जेवण व्यवस्थेचे रहस्य

विशेष : भालचंद्र ठोंबरे महाभारतात कौरव पांडवांचे युद्ध होणार, हे निश्चित झाल्यावर, देशोदेशीच्या राजांनाही या…

1 hour ago

साठवण…

विशेष : नीता कुलकर्णी गोष्ट आहे तुमच्या माझ्या आईची... आमच्या परीक्षा झाल्या की, आई वर्षभराच्या…

2 hours ago

Nostalgic song : हसता हुवा नुरानी चेहरा…

नॉस्टॅल्जिया : श्रीनिवास बेलसरे बाबुभाई मिस्त्री यांनी दिग्दर्शित केलेला ‘पारसमणी’(१९६३) ही एक छोटी संगीत मेजवानी…

2 hours ago