Tuesday, June 18, 2024
Homeताज्या घडामोडीBadrinath accident : बद्रीनाथला जाणाऱ्या भाविकांची बस नदीत कोसळली! ८ जणांचा जागीच...

Badrinath accident : बद्रीनाथला जाणाऱ्या भाविकांची बस नदीत कोसळली! ८ जणांचा जागीच मृत्यू

बसमधून १७ जण करत होते प्रवास

डेहराडून : उत्तराखंडच्या (Uttarakhand) रुद्रप्रयाग येथून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. बद्रीनाथच्या (Badrinath accident) दर्शनाला जाणाऱ्या भाविकांवर काळाने घाला घातला. या भाविकांना घेऊन जात असलेल्या मिनी बसच्या चालकाचे नियंत्रण चुकल्याने बस अलकनंदा नदीत (Alaknanda river) कोसळली. या भीषण अपघातात ८ जणांचा मृत्यू झाला तर ५ जण गंभीर जखमी झाले आहेत. या बसमध्ये १७ प्रवासी होते, अशी माहिती आहे. उत्तराखंडचे मुख्यमंत्री पुष्कर सिंह धामी (Pushkar Singh Dhami) यांनी या अपघाताच्या चौकशीचे आदेश दिले आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, रुद्रप्रयाग शहरापासून ५ किमी अंतरावर बद्रीनाथ महामार्गावरील रेंतोलीजवळ ही दुर्घटना घडली. नोएडातून हे भाविक बद्रीनाथच्या दर्शनासाठी निघाले होते. श्रीनगर येथून बद्रीनाथ महामार्गावरुन जात असताना रुद्रप्रयाग येथे हा टेम्पो ट्रॅव्हलर नदीत कोसळून भीषण अपघात झाला. अपघाताची माहिती मिळताच रेक्स्यु टीम घटनास्थळी दाखल झाली. या टीमने महत्प्रयासाने या अपघातग्रस्त वाहनातून भाविकांची सुटका केली. यातील जखमींना रुग्णालयात दाखल केले आहे.

उत्तराखंडच्या मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केला शोक

उत्तराखंडचे मुख्यमंत्री पुष्कर सिंह धामी यांनी या भीषण अपघाताचे वृत्त कळताच शोक व्यक्त केला आहे. त्यांनी आपल्या एक्स अकाऊंटवरुन प्रशासनाला मदतीचे निर्देश दिले आहेत. “रुद्रप्रयाग येथीस घटना अत्यंत वेदनादायी आहे. स्थानिक प्रशासन आणि एसडीआरएफची टीम बचावकार्य करत आहेत. जखमींना जवळील रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. जिल्हाधिकाऱ्यांनी देखील घटनेच्या तपासाचे आदेश दिले आहेत”, असं मुख्यमंत्र्यांनी आपल्या ट्वीटमध्ये म्हटलं.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

- Advertisment -