Thursday, March 28, 2024
Homeकोकणरायगडअलिबाग जेटीजवळ नौका बुडाली

अलिबाग जेटीजवळ नौका बुडाली

मालकाचे सात लाखांचे नुकसान

अलिबाग (वार्ताहर) : अलिबाग कोळीवाडा येथील समुद्रात जेटीजवळ नांगरून ठेवलेली मासेमारी नौका लाटांच्या जोरदार माऱ्यामुळे खडकांवर आदळून पाण्यात बुडाली. या घटनेमुळे नौकेच्या मालकाचे सुमारे सात लाखांचे नुकसान झाले आहे.

मंगळवारी संतोष किसन कुलाबकर यांची सागरकृपा (आयएनडी ३ एमएम २४०) ही नौका अलिबाग येथील समुद्रात जेटीजवळ नांगरून ठेवली होती. दुपारी १ च्या सुमारास लाटांच्या जोरदार तडाख्यामुळे नांगराचा दोर तुटून खडकावर जोर जोरात नौका आदळू लागली.

काही वेळातच समुद्राचे पाणी आत शिरल्याने ती बुडू लागली. ही घटना समजताच कोळीवाड्यातील अनेकांनी जेटीकडे धाव घेतली. मात्र बोट वाचवणे कोणालाच शक्य झाले नाही. सदरचे वृत्त समजताच मत्स्यव्यवसाय विभागाच्या अधिकारी आंबुलकर तसेच अलिबाग पोलीस ठाण्याचे पोलीस हवालदार हंबीरराव यांनी घटनास्थळी भेट देऊन पंचनामा केला.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -