Thane RTO: मुजोर रिक्षा चालकांवर ठाणे आरटीओची धडक कारवाई!

Share

अवघ्या १७ दिवसात तब्बल १० लाखांचा दंड वसूल

ठाणे : ठाणे स्थानक परिसरातून रिक्षाने प्रवास करणाऱ्या प्रवाशांची संख्या लक्षणीय आहे. त्यातच रिक्षाचालक प्रवाशांकडून अव्वाच्या सव्वा भाडे आकारणी, प्रवाशांशी हुज्जत घालणे, वाहतूक नियमांची पायमल्ली केली जाते. अशा मुजोर रिक्षा चालकांना शिस्त लागण्यासाठी ठाणे प्रादेशिक परिवहन विभागाने धडक मोहीम राबवली आहे.

बेशिस्त रिक्षा चालकांना शिस्त लागण्यासाठी या विभागाने १ ते १७ एप्रिल या काळात अवैध प्रवासी वाहतूक करणाऱ्या रिक्षा चालकांवर कायदेशीर कारवाई केली होती. गेल्या सतरा दिवसात तब्बल ६५० रिक्षा चालकांवर कारवाई केली असून त्यांच्याकडून तब्बल १० लाखांचा दंड वसूल केला असल्याची माहिती सहाय्यक परिवहन अधिकारी प्रसाद नलवडे यांनी दिली.

पोलिसांनी ठरवून दिलेल्या रांगेत उभे न राहता हे मुजोर रिक्षा चालक रेल्वे फ्लॅटफॉर्म क्रमांक १ आणि २ च्या प्रवेशद्वारावर उभे राहून प्रवाशांची दिशाभूल करून गाडीत बसवतात आणि जास्त भाड्याची आकारणी करतात. अशा रिक्षा चालकांवर विभागाने ठाणे प्रादेशिक परिवहन कारवाई केली आहे. बेशिस्त रिक्षा चालकांना शिस्त लागेपर्यंत ही कारवाई सुरूच राहणार आहे. त्यामुळे या रिक्षा चालकांचे धाबे दणाणले आहेत.

दंडासह परवाना आणि लायसन्स निलंबनाची कारवाई

नियम डावलून जर कोणी रिक्षा चालक वर्तन करताना आढळून आला तर त्याच्यावर कडक कारवाई होणार आहे. तसेच नियमभंग करणाऱ्या रिक्षाचालकांविरुद्ध दंडात्मक कारवाईसह परवाना निलंबन आणि लायसन्स निलंबनाची देखील कारवाई करण्यात येणार आहे, असे ठाणे येथील उपप्रादेशिक परिवहन अधिकारी जयंत पाटील यांनी सांगितले.

Recent Posts

मंगळसूत्र

मंगळसूत्र हे सौभाग्याचे लेणे आणि लग्नाचे प्रतीक मानले जाते. म्हणूनच लग्नानंतर स्त्रिया मंगळसूत्र घालतात. मंगळसुत्रातले…

3 mins ago

मुंबईतील प्राचीन धार्मिक स्थळ : महालक्ष्मी मंदिर

मुंबईतील धार्मिक स्थळांपैकी एक महालक्ष्मी मंदिर आहे. मुंबईतील महालक्ष्मीचे वास्तव्य ज्या ठिकाणी आहे, तो सारा…

22 mins ago

अद्वैताशी सांगड

माधवीताई म्हणतात की, “आजकालच्या तरुण पिढीचे आयुष्य अतिशय धावपळीचे झाले आहे. त्यांनी आयुष्यात थोडे विसाव्याचे…

33 mins ago

हसले आधी कुणी?

नॉस्टॅल्जिया - श्रीनिवास बेलसरे यशवंत पेठकर यांनी दिग्दर्शित केलेला ‘मोलकरीण’ हा १९६३ साली आलेला एक…

52 mins ago

पुत्र बभ्रुवाहनाकडून अर्जुनाचा वध

विशेष - भालचंद्र ठोंबरे अर्जुनाला चार बायका होत्या. द्रौपदी, सुभद्रा, चित्रांगदा व नागकन्या उलूपी. सुभद्रेचा…

1 hour ago

आकाशी झेप घे रे पाखरा…

संवाद - गुरुनाथ तेंडुलकर जगात कोणत्याही माणसाचा जन्म आणि मृत्यू या दोन्ही गोष्टींवर अधिकार चालत…

1 hour ago