Categories: कोलाज

प्रतिभासंपन्न

Share

डॉ. विजया वाड

सारिका विशेष लाडकी नव्हती. तिच्यावर विशेष प्रेम विद्यार्थी करतात, हे मुख्याध्यापकांना आवडत नव्हते. मुलाखतींच्या सेशनला ती आणि तीच सर्वोत्कृष्ट ठरली म्हणून या विद्यालयात तीस नोकरी मिळाली. पण सारिकाने अख्खे विद्यालयच गिळंकृत केले. सारिकामय करून टाकले. एक दिवस ती आली नाही, तर मुलुंडला विद्यार्थी घरी जात. हे जरा टू मच – थ्री मच… ‘मचमच’ होते मुख्याध्यापकांसाठी. क्या खाती है वह? विद्यार्थी इतना पसंद क्यों करते हैं उसे? हेड गुरुजींना वाट पाहावी लागली नाही; कारण कोरोना आडवा आला. कोरोनाने त्रस्त सारिकाला कम्पल्सरी विलगीकरण लागू झाले नि घरी बसावे लागले.
पण विद्यार्थी व्हीडिओ कॉलद्वारे संपर्क करू लागले. यावर हेडसर काय बोलणार?
“सारिका टीचर म्हणजे स्कूलची जान आहेत.” त्यावर हेडसर काय उत्तरणार?
“सारिका टीचर इज फुल्ल ऑफ लाइफ.” असं अगदी ‘शेवटचा’ विद्यार्थी जेव्हा सांगे त्याअर्थी नक्कीच काहीतरी ‘विशेष’ होते, हे हेडसरांनी मनोमन
मान्य केले.
‘सारिकाचा कोरोना लवकर बरा होवो’ अशी सामुदायिक प्रार्थना शाळेत एकत्रित केली, तेव्हा तर हेडसरांचा
घसाच बसला.
शेवटी सगळ्यात अप्रगत ललिता हिला एकटी
गाठली हेडसरांनी.
“ललिता, सारिका टीचर आता शाळेत येत नाहीत.”
“हो ना सर. मला तर फारच आठवण येते त्यांची.”
“चालायचंच. विलगीकरण डॉक्टरी सल्लाय ना गं!”
“हो ना सर. मला बंधनं नको वाटतात.”
“काय गं! काय एवढं लोणचं बांधलंय टीचरमध्ये?”
“अहो, माधुरी दीक्षित जाहिरात करते ना? त्यापेक्षा रुचकर लोणचंय आहे टिचरांजवळ.” ललिता म्हणाली.
“पण तेच, ‘ते’ काय?”
“तुम्हाला सांगू सर?”
“सांग सांग.” हेडगुरुजींनी म्हटलं.
“सारिका, खूप उत्सुकता लावलीस बुवा तू! एवढी कशी गं लाडकी तू… गाड्या-माड्या स्टुडंट्सची?”
गाड्या-माड्या? गया-गुजऱ्या हे आपणास लक्षात
आले असेलच.
“सर, गाड्या माड्या स्टुडंट्सपैकी मीच एक होते. सारिका टीचर शिकवेपर्यंत. त्या आल्या नि संबंध एक पीरियडभर एकच गणित शिकवले. ते विद्यार्थी नं. १ ते नं. ३५ पर्यंत सगळ्यांना येईल अशी हळुवार पद्धत वापरली.” ती विद्यार्थिनी खुलली, फुलली. मग म्हणाली, मग काय सर? सारा तास एका गणितावर घालवून त्यांनी ढ मधल्या ढ विद्यार्थ्याचा सुद्धा आत्मविश्वास जिंकला.”
“उद्या हेच गणित फळ्यावर सोडवून दाखवायचं” असा दावा सुद्धा केला त्यांनी सर्वांसमोर! मग काय, रात्रभर मी तेच गणित सोडवलं. पंचवीस वेळा.
१० वेळा बघून. १५ वेळा न बघून आणि आत्मविश्वास पंचवीसपट वाढला बघा.
“धिस इज अनबिलिव्हेबल” हेडसर अतिव आश्चर्याने म्हणाले.
“आणि सर, ते गणित मीच
सोडवलं फळ्यावर.”
“अरे वा!” हेडसर कौतुकले.
“अशी टीचरनी मला गणिताची गोडी लावली.”
“गणिताचा बागुलबुवा का वाटतो? ते पटकन समजत नाही म्हणून. पण एकदा का समजलं की डिअरेस्ट फ्रेंड होतो गणोबा.” ललिताचे सत्य बोलणे सरांना आवडले.
विशेषत: ‘डिअरेस्ट फ्रेंड गणोबा’ ही उपाधी फारच आवडली. त्यांनी सारिकाला व्हीडिओ कॉल लावला.
“सर, मी खरोखरंच आजारी आहे हो.”
“मला ठाऊक आहे ते बाळ.”
“मग?”
“तुझ्या गैरहजेरीत विद्यार्थी व्याकूळ होतात, हे मी बघतोय.”
“कारण त्या प्रत्येकावर तो सीएम साहेब असल्यागत महत्त्व देऊन मी प्रेम करते नं सर?”
“हेच, हेच कसं जमतं?”
“श्रद्धा. सर, मनुष्यमात्रावर श्रद्धा असू द्या. जमतं
मग सगळं!”
“नवा पाठ आहे गं हा माझ्यासाठी.”
“कोणीही कमी नसतो सर. प्रत्येकाजवळ अगदी प्रत्येक विद्यार्थी मित्राजवळ एक विशेष गुण असतो. कोणी भाषेत वरचढ, तर कोणी खेळात, कोणी गणितात, तर कोणी शिवणकामात. त्यामुळे कोणी कोणास कमी लेखू नये.”
“किती मोलाचं बोललीस.”
“प्रतिभासंपन्न कवी गणितात अप्रगत असले तरी त्यांनी लिहिलेले शब्द लाखमोलाचे असतात.” तिचे शब्द सरांच्या काळजावर कोरले गेले.
“सारिका, तुझ्याकडून नवा पाठ केलाय ग्रहण मी.”
“प्रतिभासंपन्न म्हणजे दशदिशातला एक स्वयंभू गुण प्रकट करण्याची ताकद अंगी बाणवलेला.” सरांचे डोळे भरून
आले होते.

Recent Posts

‘आरटीई’अंतर्गत शाळा प्रवेशाची प्रक्रिया मुंबईत सुरू

मुंबई : शैक्षणिक वर्ष २०२४-२०२५ साठी ‘शिक्षण हक्क अधिनियम’ अर्थात ‘आरटीई’अंतर्गत २५ टक्के आरक्षित जागांसाठीच्या…

3 hours ago

मलाच मुख्यमंत्री बनवा अन्यथा मातोश्रीतले बिंग फोडेन!

संजय राऊत यांनाच मुख्यमंत्री व्हायचे होते, त्यासाठी उद्धव ठाकरेंना ब्लॅकमेल केल्याचा आमदार नितेश राणे यांचा…

4 hours ago

Lok Sabha Election : राहुल गांधी आणि अखिलेश यादव यांच्या सभेत चेंगराचेंगरी

दोन्ही नेते भाषण न करता निघून गेले फुलपूर : लोकसभा निवडणुकीच्या (Lok Sabha Election) पार्श्वभूमीवर…

5 hours ago

Cloudburst : अरे बाप रे! मे महिन्यात इतका पाऊस कसा झाला? हवामान विभागालाही पडला प्रश्न

चिपळूणात ढगफुटी, अडरे गावात अर्ध्या तासात रेकॉर्डब्रेक पाऊस, नद्या दुथडी भरुन वाहू लागल्या चिपळूण :…

5 hours ago

काँग्रेस म्हणजे भ्रष्टाचाराची जननी

काँग्रेस आणि झामुमो यांनी झारखंडला लुटण्याची एकही संधी सोडली नाही पंतप्रधान मोदींनी विरोधकांना झोडपले! जमशेदपूर…

5 hours ago

पतंजलीच्या उत्पादनाचा दर्जा निकृष्ट! सोनपापडी गुणवत्ता चाचणीत फेल, तिघांना तुरुंगवास

नवी दिल्ली : फसव्या जाहिरातींप्रकरणी सर्वोच्च न्यायालयाच्या दणक्यामुळे पतंजली कंपनीचे संस्थापक रामदेव बाबा आणि बाळकृष्ण…

5 hours ago