Tuesday, June 18, 2024
Homeटी-२० विश्वचषकT-20 world cup 2024: USA आणि आयर्लंडचा सामना पावसामुळे रद्द, पाकिस्तानला मोठा...

T-20 world cup 2024: USA आणि आयर्लंडचा सामना पावसामुळे रद्द, पाकिस्तानला मोठा झटका

मुंबई: १४ जूनला होणारा यूएसए विरुद्ध आयर्लंड हा सामना खराब हवामान आणि पावसामुळे रद्द करण्यात आला आहे. स्टेडियम परिसरात गेल्या अनेक दिवसांपासून पाऊस सुरू आहे. सामना अधिकारी आणि अंपायर्सनी अनेक वेळा मैदानाची पाहणी केली. मात्र त्यानंतर अखेर हा सामना रद्द करण्याची घोषणा करण्यात आली. सामना रद्द झाल्याने यजमान यूएसएने टी- २० वर्ल्डकप २०२४च्या सुपर ८मध्ये स्थान मिळवले आहे. हा सामना रद्द झाल्याने पाकिस्तानला मोठा झटका बसला आ

सुपर ८ – यूएसए इन, पाकिस्तान आऊट

आयर्लंडविरुद्धचा सामना रद्द झाल्याने यूएसएला एक अंक मिळाला आहे. यामुळे त्यांचे ५ गुण झाले आहेत. यासोबतच यूएसएने टी-२० वर्ल्डकप २०२४च्या सुपर ८मध्ये स्थान मिळवले आहे. पाकिस्तानचा संघआणि त्यांचे चाहते ही आस लावून बसले होते की आयर्लंडने यूएसएला हरवावे . कारण जर आयर्लंड जिंकला असता तर पाकिस्तानच्या सुपर ८मधील आशा कायम राहिल्या असता. मात्र आता पाकिस्तानने विजय जरी मिळवला तरी ते सुपर ८ मध्ये जाऊ शकणार नाहीत.

अमेरिकेतील फ्लोरिडा राज्यातील काही भागांमध्ये काही दिवसांपासून पाऊस सुरू आहे. यामुळे येथे अनेक ठिकाणी पाणीही भरले आहे. येथील सेंट्रल ब्रोवार्ड रीजनल पार्क स्टेडियममध्ये यूएसए आणि आयर्लंड यांच्यातील सामना रंगणार होता. याच मैदानावर भारत वि कॅनडा आणि पाकिस्तान विरुद्ध आयर्लंड सामना रंगणार आहे. मात्र खराब हवामान आणि सातत्याने होणारा पाऊस यामुळे येथील रस्त्यांवर पाणी भरले. अशातच ग्रुप एच्या तीन सामन्यांमध्ये पावसाची बाधा येऊ शकते.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

- Advertisment -