स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या स्नुषा स्वामिनी सावरकर यांचे निधन

Share

पुणे: स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या स्नुषा तसेच हिंदुमहासभेचे राष्ट्रीय अध्यक्ष दिवंगत विक्रमराव सावरकर यांच्या अर्धांगिनी स्वामिनी सावरकर यांचे पुणे येथे अल्पशा आजाराने वयाच्या ८४ व्या वर्षी निधन झाले. त्यांच्या निधनाने सावरकर भक्तांमध्ये शोककळा पसरली आहे.

स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या विचारांचा वारसा आयुष्यभर जपत त्यांनी विक्रमराव सावरकर यांनाही त्यांच्या संघटन कार्यात साथ दिली. प्रज्वलंत या सावरकरांच्या विचारांवरील मासिकाचे कामकाज त्यांनी सांभाळले. मुरबाड (ठाणे) येथील महाराष्ट्र मिलिटरी स्कूलच्या उभारणीत तसेच संस्थेचे कार्यात त्यांचा कायम सक्रीय सहभाग राहिला. विक्रमराव सावरकर यांच्या युद्ध आमुचे सुरु (नवी आवृत्ती- मनःस्वी) तसेच कवडसे या पुस्तकांसाठीही त्यांनी सहभाग दिला. यशोगीत सैनिकांचे हे पुस्तक त्यांनी नुकतेच लिहिले होते. स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या विचारांवरील कार्यासाठी त्या नेहमीच प्रोत्साहित करत असत.

स्वामिनी सावरकर या पूर्वाश्रमीच्या मंदाकिनी गोखले होय. नागपूर येथील पांडुरंग गोखले परिवारात त्यांचा १८ डिसेंबर १९३९ या दिवशी जन्म झाला. त्यांचा विवाह नारायणराव सावरकर यांचे पुत्र विक्रमराव यांच्यासमवेत झाला. पृथ्वीराज आणि रणजित अशी त्यांची दोन मुले असून पृथ्वीराज यांचे नुकतेच निधन झाले तर रणजित हे स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारकाचे कार्याध्यक्ष आहेत.

Recent Posts

Vinod Tawde : ‘आयेगा तो मोदीही’ ही भावना मतदार आणि विरोधकांमध्ये निर्माण करण्यात आम्ही यशस्वी!

पुण्यात विनोद तावडे यांचं वक्तव्य पुणे : एनडीए सरकारची (NDA) दहा वर्षाची कामगिरी आणि २०४७…

20 mins ago

Deep fake videos : निवडणुकीदरम्यान ‘डीप फेक’ रोखण्यासाठी कारवाई करण्याचे शासनाचे आदेश

मुंबई : लोकसभा निवडणुकीदरम्यान डीप फेक व्हिडिओज, क्लिप्स, फोटो किंवा इतर प्रकारचा कंटेंट तयार करून…

1 hour ago

Summer Fruits: ही फळे चुकूनही फ्रीजमध्ये ठेवू नका

मुंबई: आपण सर्व आठवडाभर फळे आणि भाज्या रेफ्रिजेटरमध्ये स्टोर करतात. मात्र काही फळे फ्रीजमध्ये ठेवल्याने…

2 hours ago

Amit Shah : इंडिया आघाडी म्हणजे औरंगजेब फॅन क्लब!

राममंदिराच्या विरोधकांसोबत उद्धव गेले; ते महाराष्ट्राचा गौरव काय सांभाळणार? रत्नागिरीतून अमित शाह यांचे टीकास्त्र रत्नागिरी…

3 hours ago

वाशीतील केबीपी कॉलेजला नॅक कडून ए प्लस प्लस ग्रेड

नवी मुंबई : रयत शिक्षण संस्थेच्या वाशी येथील कर्मवीर भाऊराव पाटील कॉलेजला राष्ट्रीय मूल्यांकन व…

3 hours ago

Eknath Shinde : विरोधकांकडे मशाल नसून आईस्क्रीमचा कोन आहे जो उन्हात वितळणार!

ठाण्यातून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा ठाकरेंना जोरदार टोला नरेश म्हस्के यांचा उमेदवारी अर्ज नव्हे तर…

3 hours ago