स्वामी समर्थ चालिसा

Share

चाळीस जन्म सोबत समर्थ स्वामी
जे स्वामी चालिसा वाचतील मनोमनी ।। १।।

जे स्वामी समर्थ रोज स्मरती
नित्य त्यात दत्तगुरू पाहती ।। २।।

साक्षात श्रीदत्तगुरूंची हसरी मूर्ती
करी साऱ्या कामाची पूर्ती ।। ३।।

दत्तगुरू प्रथम प्रेमळ अवतार
द्वितीय श्रीपादवल्लभ अवतार ।। ४।।

तृतीय ते नृसिंह सरस्वती अवतार
चतुर्भुज ते स्वामी समर्थ अवतार ।। ५।।

कधी वारुळातूनी घेतला अवतार
कधी वटवृक्षाद्वारे घेतला अवतार ।। ६।।

कधी घेतला ओंकारातून अवतार
कधी धरणीतूनच भुवरी अवतार ।। ७।।

लोकांवाटे आकाशातूनच घेतला अवतार
कधी कोठे जंगलात घेतला अवतार ।। ८।।

कधी शोधू नये नदीचे मूळ
कधी शोधू नये गुरूचे कुळ ।। ९।।

हसत हसत बोले औदुंबराचे मूळ
कधी डोले वटवृक्षाचे पारंबी मूळ ।। १०।।

आदित्यासम तेजस्वी चेहरा
चंद्रासम शीतल तू गुरुवरा ।। ११।।

करुण वत्सल स्वामी दयाघना
अति प्रेमळ मूर्ती मनामना ।। १२।।

चित्त बुद्धी स्थिर करीशी ध्याने
भक्तिमार्ग तव डोळस श्रद्धेने ।। १३।।

सार्थक झाले शतजन्माचे
ऋण फिटले सारे जन्माचे ।। १४।।

कर्म करूनही न उरली आसक्ती
दिनरात करता तुझीच भक्ती ।। १५।।

सुख समाधानात शांतीची शक्ती
तुझ्यामुळेच आली अंगात शक्ती ।। १६।।

तू साऱ्यांचा करुणा सागर
शीतल भक्तीने भरली घागर ।। १७।।

हाती धरला नामजपाच्या नांगर
साक्षात झाला सोन्याचाच नांगर ।। १८।।

अजानबाहू तुझे मनोहर रूप
तू स्वामी सर्वांगाने सुस्वरूप ।। १९।।

अज्ञानींसाठी घेतले सामान्यरूप
विद्वानांसाठी घेतले गुरुरूप ।। २०।।

शरण आणण्या शत्रूस घेतले उग्ररूप
जसे अर्जुनास दाविले श्रीकृष्ण विश्वरूप ।।२१।।

भूत-पिशाच्चं केले सरळ

अनेकांच्या मनातील झटकले वारूळ ।। २२।।

राजे-राजवाडे केले अनेक सरळ

गच्च दातखिळी हाती दिला नारळ ।। २३।।

भक्ताहाती सदिच्छेचे श्रीफळ

भक्त बालकांप्रती प्रेम सुफळ ।। २४।।

गर्व न बाळगता आले जे शरण

चुकविले स्वामीने त्यांचे मरण ।। २५।।

फोडिले अनेक संकटाचे धरण

भुकेलेल्या दिले प्रसाद भात-वरण ।। २६।।

प्रेमळ स्वामी समर्थ दत्त अवधूत

तेहतीस कोटी देवांचा तू दूत ।। २७।।

गंगेकाठी जशी पापे धूत

स्वामी नजरेने सारी पापे धूत ।। २८।।

छेली खेडेग्रामी तू अवतरला

जगउद्धारासाठी खरा अवतरला ।। २९।।

चोळप्पा बाळाप्पाचे केले कल्याण

अक्कलकोटाचे झाले महाकल्याण ।। ३०।।

तुझ्यासारखा नाही कोणी दयाळू

तुझ्यासारखा नाही कोणी मायाळू ।। ३१।।

ज्याच्या घराला स्वामींचा स्पर्श

त्या घराला लक्ष्मीचा स्पर्श ।। ३२।।

ज्याच्या घरात येई संकट

स्वामी नाम घेता पळे संकट ।। ३३।।

सोपा सुखकर मार्ग दाविती

सदा गावी स्वामींची कीर्ती ।। ३४।।

स्वामी नामात नाही अंधश्रद्धा

नास्तिक हो ठेवा पूर्णश्रद्धा ।। ३५।।

येईल अनुभव याच जन्मी

पारणे फिटेल जन्मोजन्मी ।। ३६।।

मनोभावे जे स्वामी पूजती

नाही चिंता नाही भीती ।। ३७।।

स्वामी नाम घेता अंधारात उजाला

सिकंदर पौरस सामना जिंकला ।। ३८।।

अमर दत्तरूप तू मानवदेही

भक्त मागती ती संपदा तू देई ।। ३९।।

भक्त विलासाची वाहे सरिता

स्वामी चालिसाचा जप आचरिता ।। ४०।।

बोला स्वामी समर्थ महाराज की जय!!

  • विलास खानोलकर

vilaskhanolkardo@gmail.com

Recent Posts

Team India: टीम इंडियाचे सुपर८ साठी वेळापत्रक ठरले…पाहा कोणाचे रंगणार सामने

मुंबई: भारत आणि कॅनडा यांच्यात फ्लोरिडाच्या लॉडरहिलमध्ये सामना खेळवला जाणार होता. मात्र हा सामना पावसामुळे…

14 mins ago

कार, बस अथवा ट्रेन….कोणत्याही प्रकारच्या वाहनामध्ये ही असते सुरक्षित सीट

मुंबई: प्रवासादरम्यान हा सवाल प्रत्येकाच्या मनात येतो की ज्या गाडीत ते बसले आहेत तिथे सर्वात…

1 hour ago

NAM vs ENG: इंग्लडने नामिबियाला हरवले, आता ऑस्ट्रेलिया जिंकल्यानंतर मिळणार सुपर८चे तिकीट

मुंबई: आयसीसी टी-२० वर्ल्डकप २०२४च्या ३४व्या सामन्यात इंग्लंडने नामिबियाला ४१ धावांनी हरवले. १५ जूनला शनिवारी…

2 hours ago

डॉक्टर रुग्णाला तपासताना पोट दाबून का बघतात? घ्या जाणून

मुंबई: डॉक्टर नेहमी चेकअपदरम्यान अथवा पोट दुखीचा त्रास असल्यास तुमचे पोट दाबून का बघतात? जाणून…

3 hours ago

मी म्हणजे मार्क नव्हेत!

शिक्षणाचा मूळ हेतू मुलांना साक्षर करणं, सुशिक्षित करणं असला, तरी पालकांचं उद्दिष्ट त्याला सुसंस्कृत माणूस…

7 hours ago

संस्कृती आणि मानवी जीवन

विशेष - लता गुठे जेव्हा साहित्याचा अभ्यास करू लागले तेव्हा लक्षात आलं कोणतीही कला असो…

7 hours ago