“शेअर बाजारावर मोठ्या घसरणीचे सावट”

Share

डॉ. सर्वेश सुहास सोमण

शेअर बाजाराच्या मागील आठवड्यात निर्देशांकात पुन्हा एकदा मोठी घसरण पाहावयास मिळाली. रशिया आणि युक्रेन यांच्यामधील तणावपूर्ण आठवडा कायम राहिला. त्यांच्यात पूर्ण आठवडाभर युद्ध सुरूच आहे. त्याचा परिणाम सर्व जगातील शेअर बाजारावर झालेला आहे.

आपण मागील लेखात सांगितल्याप्रमाणे प्रत्येक आंतरराष्ट्रीय तणावजन्य परिस्थितीत नेहमी जास्तीत जास्त गुंतवणूक ही सोन्यांमध्ये होते. या आठवड्यात देखील रशिया आणि युक्रेन यांच्यामधील तणाव आणि युद्ध कायम राहिले आणि त्यामुळे एका बाजूला सर्व जगातील शेअर बाजार मोठ्या प्रमाणात कोसळत असताना सोने या मौल्यवान धातूने पुन्हा एकदा विक्रमी वाढ दर्शविली. या आठवड्यात सोन्यामध्ये जवळपास २३०० रुपयांची मोठी वाढ झाली.

तांत्रिक विश्लेषणानुसार, चार्टचा विचार करता पुढील काळात देखील सोन्यामध्ये यापुढे देखील वाढ होऊ शकते. मात्र सोन्यामध्ये पुढील काही आठवड्यांत करेक्शन अर्थात तेजीनंतरची तात्पुरती मंदी येऊ शकते. मात्र मध्यम मुदतीच्या चार्टनुसार सोन्याने तेजी सांगणारे संकेत दिलेले आहेत. त्यामुळे सोन्यामध्ये होणारे करेक्शन ही खरेदीची संधी असेल.

सध्या अल्प मुदतीच्या चार्टनुसार निर्देशांकाची मंदी झालेली असून टेक्निकल अॅनालिसीसनुसार मंदीत असणाऱ्या शेअर्समध्ये अल्पमुदतीचा विचार करता स्टॉपलॉसचा वापर करूनच मंदीचा व्यवहार करता येईल. चार्टनुसार एचडीएफसी लिमिटेड, एचडीएफसी बँक, ज्युबिलीएंट फूड, हिरोमोटोकोर्प यांसारख्या अनेक दिग्गज शेअर्सची दिशा मंदीची झालेली आहे.

“आरती इंडस्ट्रीज लिमिटेड” या शेअरने ८४० ही पातळी तोडत मंदी सांगणारी रचना तयार केलेली असून आज ८३० रुपये किमतीला असणाऱ्या या शेअरमध्ये पुढील काळात आणखी ७ ते १० टक्क्यांची घसरण होणे अपेक्षित आहे.

त्यामुळे या शेअरमध्ये योग्य स्टॉपलॉस ठेवून मंदीचा व्यवहार केल्यास चांगला फायदा होऊ शकेल.

मध्यम मुदतीच्या चार्टनुसार, या आठवड्यासाठी निर्देशांक सेन्सेक्सची ५६००० आणि निफ्टीची १६५०० ही अत्यंत महत्त्वाची पातळी आहे. जोपर्यंत निर्देशांक या पातळीच्या खाली आहेत तोपर्यंत निर्देशांकामधील मंदी कायम राहील.

सध्या चालू असणाऱ्या आंतरराष्ट्रीय घडामोडी आणि त्यानंतर शेअर बाजारात झालेल्या मोठ्या घसरणीनंतर पुढील आठवड्यांसाठी शेअर बाजार आणखी बाऊन्स बॅक करू शकतात. ज्यामध्ये निफ्टी १६६०० उसळी घेऊ शकतो. शेअर बाजारात पुढील काळात होणारी वाढ कितपत टिकेल हे पाहणे महत्त्वाचे आहे. सध्या शेअर बाजारात येणारा प्रत्येक बाऊन्स हा विक्रीची उत्तम संधी असेल.

टेक्निकल बाबतीत पाहायचे झाल्यास निफ्टीने अल्पमुदतीच्या आणि मध्यम मुदतीच्या चार्टनुसार १६४०० ही पातळी बंद तत्त्वावर तोडलेली आहे. मी माझ्या मागील लेखात सांगितल्याप्रमाणे मध्यम मुदतीच्या चार्टनुसार निर्देशांक निफ्टीमध्ये मंदीचा “हेड अँड शोल्डर” तयार झालेला आहे. हेड शोल्डर फोर्मेशन तयार होणे हे मध्यम मुदतीच्या चार्टनुसार मोठ्या घसरणीचे संकेत देत आहे.

मागील लेखात सांगितल्याप्रमाणे निफ्टीमध्ये पुढील काळात जवळपास २००० ते २५००० अंकांची घसरण होणे अपेक्षित आहे. बँक निफ्टीकडे पाहायचे झाल्यास बँक निफ्टीमध्ये देखील मंदीची रचना तयार झालेली आहे. या रचनेनुसार बँक निफ्टी पुढील काळात मध्यम मुदतीत जवळपास ४००० ते ५००० अंकांची मोठी घसरण पाहावयास मिळू शकते. त्यामुळे पुढील काळात निफ्टी १४०००, तर बँक निफ्टी ३२००० या पातळीपर्यंत येणे अपेक्षित आहे. एकूण तयार झालेले मंदीचे संकेत लक्षात घेता घाईगडबड न करता शेअर्स आणखी स्वस्त होण्याची वाट बघणेच योग्य ठरेल.

आपण मागील लेखातच कमोडीटी मार्केटमध्ये टेक्निकल अॅनालिसीसनुसार कच्चे तेल अजूनही तेजीत असून जोपर्यंत कच्चे तेल ७१०० या पातळीच्या वर आहे तोपर्यंत कच्च्या तेलात आणखी वाढ होऊ शकते. मध्यम मुदतीच्या चार्टनुसार कच्च्या तेलाची ८००० ही खरेदीची पातळी असून जोपर्यंत कच्चे तेल ७१०० या पातळीच्या वर आहे तोपर्यंत कच्च्या तेलातील तेजी कायम राहील.

अल्पमुदतीसाठी सोने या मौल्यवान धातूची दिशा तेजीची असून मध्यम मुदतीच्या चार्टनुसार जोपर्यंत सोने ५०००० या पातळीच्या वर आहे, तोपर्यंत सोन्यात आणखी वाढ होणे अपेक्षित आहे.

samrajyainvestments@gmail.com

Recent Posts

रा. जि.प शाळा चोरढे मराठी येथे साकारला नवागतांचा मेळावा….

मुरुड, (प्रतिनिधी संतोष रांजणकर) हर्ष हा साकारला मनी आनंदाच्या या क्षणी नवागतांचे करी स्वागत सर्व…

7 hours ago

Mobile: दिवसभरात किती तास वापरला पाहिजे मोबाईल फोन? तुम्हाला माहीत आहे का…

मुंबई: आजच्या काळात मोबाईल फोन आपल्या जीवनाचा अविभाज्य भाग बनला आहे. संपूर्ण दिवस हल्ली सगळेच…

8 hours ago

Hardik pandya: हार्दिक पांड्याचा मुलासोबत क्यूट Video, नाही दिसली पत्नी

मुंबई: आयसीसी पुरुष टी-२० वर्ल्डकप २०२४मध्ये भारतीय संघाची कामगिरी चांगली होत आहे आणि ते सुपर…

8 hours ago

Health: तुम्ही मुलांना टाल्कम पावडर वापरता का? आजच थांबा

मुंबई: मुलांमध्ये उन्हाळा आणि घामापासून बचावासाठी अधिकतर आंघोळीनंतर मुलांना भरपूर टाल्कम पावडर लावतात. असे केल्या…

10 hours ago

Kalyan News : रस्त्याच्या निकृष्ट कामामुळे नागरिकांचा खड्ड्यात बसून ठिय्या

योगिधाम परिसरात मुख्य रस्त्यात खड्डा खणल्याने नागरिक संतप्त कल्याण : कल्याण पश्चिमेतील योगिधाम परिसरात नुकताच…

11 hours ago

Sikkim Rain : सिक्कीममध्ये पावसाच्या थैमानात महाराष्ट्रातील २८ जण अडकले!

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे अ‍ॅक्शन मोडमध्ये; अडकलेल्यांशी संपर्क साधत दिला धीर डेहराडून : महाराष्ट्रात अनेक ठिकाणी…

11 hours ago