Sunday, June 16, 2024
Homeसाप्ताहिकअर्थविश्वStock Market : शेअर बाजार करेक्शनच्या चक्रात...

Stock Market : शेअर बाजार करेक्शनच्या चक्रात…

  • गुंतवणुकीचे साम्राज्य : डॉ. सर्वेश सुहास सोमण

आपण आपल्या मागील काही लेखांत सांगितल्याप्रमाणे आता शेअर बाजाराच्या पुढील वाटचालीचा अंदाज बांधत असताना एक गोष्ट गुंतवणूकदारांनी लक्षात घेतली पाहिजे ती म्हणजे शेअर बाजाराचे पीई गुणोत्तर. सध्या पीई गुणोत्तर खूप जास्त आहे. आपण मागील लेखात सांगितल्या प्रमाणेच शेअर बाजारात उच्चांकापासून घसरण पहावयास मिळाली. सध्या मध्यम मुदतीच्या चार्टनुसार निर्देशांकाची गती तेजीची आहे. मात्र अल्पमुदतीच्या चार्टनुसार निर्देशांकाची दिशा ही मंदीची असून निफ्टीची १८८८६ ही महत्वाची पातळी आहे. जोपर्यंत निर्देशांक या पातळीच्या खाली आहेत तोपर्यंत निर्देशांकामधील मंदी कायम राहील.

अल्पमुदतीच्या चार्टनुसार निर्देशांक बऱ्याच कालावधीनंतर रेंज बाउंड स्थितीतून बाहेर पडलेले आहेत त्यामुळे पुढील कालाचा विचार करीता सेन्सेक्समध्ये ५०० अंकांनी आणि निफ्टीमध्ये २०० अंकांनी आणखी घसरण होऊ शकते. त्यामुळे शेअर्समध्ये व्यवहार करीत असताना निर्देशांकाच्या वरील पातळ्या लक्षात ठेवूनच शेअर्समध्ये गुंतवणूक करणे आवश्यक आहे. शेअर बाजारात या आठवड्याच्या वाढीमध्ये ग्रासिम, सनटेक, टाटा स्टील, रेडिंगटोन यांनी सहभाग घेतला. सद्य स्थितीला अल्पमुदतीचा विचार करीता सिटी युनियन बँक, अदानी टोटल गॅस लिमिटेड, सनटेक यासह अनेक शेअर्सची दिशा ही अल्प तसेच मध्यम मुदतीसाठी मंदीची आहे.

कच्चे तेलाची ६१०० ही अत्यंत महत्त्वाची पातळी असून जोपर्यंत कच्चे तेल या पातळीच्या खाली आहे तोपर्यंत अल्पमुदतीच्या चार्टनुसार कच्चे तेलातील मंदी टिकून राहील. करन्सी मार्केटमध्ये डॉलर देखील अजूनही रेंज बाउंड असून तो ८३ रुपये ते ८१.५० रुपये या मर्यादित किंमतीत हालचाल करीत आहे. अल्पमुदतीच्या चार्टनुसार आता डॉलरची गती ही तेजीची असून डॉलर जोपर्यंत ८१.५० या पातळीच्या वर आहे तोपर्यंत यापुढे डॉलरमध्ये वाढ होणे अपेक्षित आहे. मात्र डॉलर ८३ ही पातळी ओलांडत नाही तोपर्यंत होणारी वाढ ही मर्यादित असेल. सध्या निर्देशांकाची दिशा मंदीची असून मंदीची दिशा असणाऱ्या शेअर्समध्ये मंदीचे व्यवहार केल्यास चांगला फायदा होवू शकेल. शुक्रवारी सेन्सेक्स ६२९७९ तर निफ्टी १८६६५ या अंकाना बंद झाले. दीर्घमुदतीच्या चार्टनुसार मात्र निर्देशांकाची दिशा अजूनही तेजीचीच असून सध्या होत असलेली घसरण ही तेजीनंतर आलेली मंदी अर्थात करेक्शन आहे. त्यामुळे शेअर बाजारातील होणाऱ्या प्रत्येक घसरणीत दिग्गज कंपन्यावर लक्ष ठेवणे आवश्यक आहे. त्यामुळे टेक्निकल अॅनालिसीसनुसार तेजीत असणाऱ्या शेअर्समध्ये अल्पमुदतीचा विचार करता स्टॉपलॉसचा वापर करूनच तेजीचा व्यवहार करता येईल.

अल्पमुदतीसाठी करुर वैश्य बँक, एचएएल, अपटेक यासह अनेक शेअर्सची दिशा तेजीची आहे. मी माझ्या मागील ८ मे च्या लेखात अल्पमुदतीचा विचारकरिता ‘स्टार सिमेंट’ या शेअरने १२४ ही अत्यंत महत्वाची पातळी तोडत टेक्निकल अॅनालिसीसनुसार तेजीची दिशा दाखविलेली आहे. त्यामुळे आज १२७ रुपये किमतीला असणाऱ्या या शेअरमध्ये अल्पमुदतीसाठी खरेदी केल्यास चांगला फायदा होऊ शकेल. हे सांगितलेले होते.

आपण सांगितल्यानंतर या शेअरने १५० हा उच्चांक नोंदविलेला आहे. टक्केवारीत पहावयाचे झाल्यास या शेअरमध्ये १८ टक्क्यांची वाढ झालेली आहे. अल्पमुदतीसाठी सोने या मौल्यवान धातूची दिशा मंदीची असून सोने ६०००० ते ५८६०० या पातळीत आहे. अल्पमुदतीच्या चार्टनुसार सोन्यामध्ये जरी मंदीची असली तरी मागील काही महिन्यात झालेल्या मोठ्या घसरणी नंतर आता सोन्यात वाढ होणे अपेक्षित आहे. आपण मागील लेखातच सांगितलेल्या प्रमाणे निर्देशांकात ऑप्शन प्रकारात जोखीम घेण्याची क्षमता असणाऱ्यांना या महिन्याची एक्सपायरी ‘पुट ऑप्शन’प्रकारात गुंतवणूक केल्यास चांगला यदा होऊ शकतो. मात्र ऑप्शन प्रकारात ट्रेड करीत असताना त्यातील धोके लक्षात घेऊन गुंतवणूक करता येईल.

(सूचना: लेखकाची तसेच त्यांच्या जवळच्या नातेवाइकांची लेखात सुचवित असलेल्या कंपन्यांच्या शेअर्समध्ये कोणतीही गुंतवणूक नाही किंवा सुचविलेल्या कंपन्यांशी लेखकाचा कुठलाही संबंध नसून कंपनीकडून कोणतेही मानधन किंवा भेटवस्तू घेतलेली नाही)

(samrajyainvestments@gmail.com)

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

 

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -