स्पाइस जेटचा पुन्हा धक्का; शिर्डीचे विमान नाशिकहून उड्डाण

Share

नाशिक : स्पाइस जेट कंपनीने आपले धक्का तंत्र सुरूच ठेवले असून आज सायंकाळी साडेपाच वाजता शिर्डी वरून तिरुपतीला उड्डाण करणारे विमान हे तांत्रिक कारण सांगून नाशिकहून टेक ऑफ करणार असल्याचं जाहीर केले. त्यामुळे प्रवाशांची धावपळ झाली.

शिर्डीला गेलेले प्रवासी विमान कंपनीने नाशिकमध्ये परत आणले असले तरी नाशिकहून जाणाऱ्या अनेक प्रवाशांना अर्धवट स्थितीत प्रवास करून सिन्नर- नाशिकरोडहून पुन्हा नाशिकला यावे लागले. दोन दिवसांपूर्वी कंपनीने नाशिकच्या ओझर येथील दिल्लीला विमान पाठवताना त्यातील प्रवाशांचे लगेज हे ओझरवरच ठेवले होते. त्याची पूर्वकल्पना प्रवाशांना देण्यात आली नव्हती.

त्यामुळे दिल्ली विमानतळावर प्रवासी उतरल्यावर गोंधळ झाला होता त्यानंतर ओझर येथून टेम्पोने प्रवाशांचे बॅगेज हे मुंबईला नेऊन तेथून पुन्हा मध्यरात्री दिल्लीला विमानतळावर पाठवण्यात आले. त्यामुळे प्रवाशांच्या हाल झाले होते. त्यानंतर आता पुन्हा आणखी एक धक्का कंपनीने दिला आहे आज शिर्डी ते तिरुपती हे विमान साडेपाच वाजता शिर्डी विमानतळावरून उड्डाण करणार होते.

मात्र तांत्रिक कारणामुळे ते आता नाशिकहून उड्डाण करणार असून विमान सेवेची वेळ बदलण्यात आली आहे साडेपाचला शेड्युल असलेले विमान आता नाशिकच्या ओझर विमानतळावरून साडेसात वाजता निघणार आहे.

Recent Posts

प्रेमकहाणी भाग-१

नक्षत्रांचे देणे : डॉ. विजया वाड प्रेमकहाणी या लेखामधून दोन प्रेमी जीवांची झालेली ताटातूट, तरी…

5 mins ago

Drought : डोळे उघड माणसा…

विशेष : लता गुठे रस्त्याच्या दोन्ही बाजूला असलेली झाडे आणि त्यांच्या एकमेकांमध्ये गेलेल्या फांद्या यामुळे…

10 mins ago

Mahabharat : महाभारत युद्धातील जेवण व्यवस्थेचे रहस्य

विशेष : भालचंद्र ठोंबरे महाभारतात कौरव पांडवांचे युद्ध होणार, हे निश्चित झाल्यावर, देशोदेशीच्या राजांनाही या…

14 mins ago

साठवण…

विशेष : नीता कुलकर्णी गोष्ट आहे तुमच्या माझ्या आईची... आमच्या परीक्षा झाल्या की, आई वर्षभराच्या…

24 mins ago

Nostalgic song : हसता हुवा नुरानी चेहरा…

नॉस्टॅल्जिया : श्रीनिवास बेलसरे बाबुभाई मिस्त्री यांनी दिग्दर्शित केलेला ‘पारसमणी’(१९६३) ही एक छोटी संगीत मेजवानी…

31 mins ago

Cartoon characters : आपली मुलं कार्टून्सच्या माध्यमातून काय पाहताहेत?

आनंदी पालकत्व : डॉ. स्वाती गानू पूर्वी मनोरंजन हाच कार्टून्सचा मुख्य हेतू होता. तंत्रज्ञानातील बदलाने…

43 mins ago