Friday, April 19, 2024
Homeमहत्वाची बातमीSindhudurg District : सिंधुदुर्ग जिल्ह्यात नियमन आदेश लागू

Sindhudurg District : सिंधुदुर्ग जिल्ह्यात नियमन आदेश लागू

जिल्हा पोलीस अधीक्षक सौरभ कुमार अग्रवाल यांची माहिती

सिंधुदुर्गनगरी (वृत्तसंस्था) : ग्रामपंचायत सार्वत्रिक निवडणूक (Sindhudurg District) २०२२ च्या दरम्यान कोणताही अनूचित प्रकार, घटना न घडता निवडणूक प्रक्रिया शांततेत व सुरळीत पार पडावी.

समाजामध्ये सामाजिक शांतता व परस्पर सामंजस्याची भावना वाढीस लागून सामाजिक एकात्मता अबाधित रहावी, यासाठी दिनांक ६ ते २० डिसेंबर २०२२ या कालावधीत सिंधुदुर्ग जिल्ह्यात महाराष्ट्र पोलीस अधिनियम १९५१ चे कलम ३६ प्रमाणे नियमन आदेश जारी करण्यात आले असल्याची माहिती पोलीस अधीक्षक सौरभ कुमार अग्रवाल यांनी दिली आहे.

राज्य निवडणूक आयोगाकडील पत्रान्यवे सिंधुदुर्ग जिल्ह्यात निवडणूका असलेल्या ३२५ ग्रामपंचायतींच्या कार्यक्षेत्रात आचार संहिता लागू करण्यात आलेली आहे. तसेच निवडणूक कार्यक्रमानूसार १८ डिसेंबर २०२२ रोजी मतदान होणार असून दि.२० डिसेंबर २०२२ रोजी मतमोजणी होणार आहे.

दिनांक ०६ डिसेंबर रात्री ००:०१ वाजल्यापासून ते दिनांक २० डिसेंबर २०२२ रोजी रात्री २४.०० वाजे पर्यंत सिंधुदुर्ग जिल्हयातील सर्व पोलीस ठाणे प्रभारी अधिकारी व त्यांच्यावरील सर्व पोलीस अधिकाऱ्यांना महाराष्ट्र पोलीस अधिनियम १९५१ चे कलम ३६ मधील पोटकलम ‘अ’ ते ‘फ’ प्रमाणे खालील बाबतीत लेखी किंवा तोंडी आदेश देण्याचा अधिकार प्रदान करण्यात येत आहेत.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -