Shocking! नववीतल्या मुलीचा शाळेतच हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू

Share

बीड : बीड (Beed) शहरात नववीच्या वर्गात शिकणारी एक १५ वर्षाची विद्यार्थिनी नेहमीप्रमाणे शाळेत गेली होती. प्रार्थना संपल्यानंतर ती आपल्या वर्गात बसली असतानाच, तिला अचानक भोवळ आली आणि काही कळण्या अगोदरच या मुलीचा दुर्दैवी मृत्यू झाला. रेश्मा शेख असे या मुलीचे नाव आहे. या घटनेनंतर पालकांमध्ये खळबळ उडाली असून, चिंताही वाढली आहे.

नववीच्या वर्गात शिकणारी १५ वर्षीय रेश्मा नेहमीप्रमाणे सकाळी शाळेत गेली होती. दुपारची सुट्टी झाल्यानंतर तिने आपल्या आईसोबत शाळेत जेवण केलं. जेवण झाल्यावर पुन्हा ती आपल्या वर्गात जाऊन बसली. पण याचवेळी तिला अचानक भोवळ आल्याने ती बेशुद्ध झाली. त्यानंतर शिक्षकांनी तिला तत्काळ रुग्णालयात दाखल केले. मात्र रुग्णालयात पोहोचण्या अगोदरच रेश्माचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाला. या घटनेने रेश्माच्या आई-वडीलांना मोठा धक्का बसला आहे.

रेश्मा बीड शहरातल्या एका खाजगी शाळेमध्ये नववीच्या वर्गात शिक्षण घेत होती. दुपारपर्यंत शाळेत जायचे आणि त्यानंतर तिचं ट्युशन असायचं. त्यामुळे अभ्यासाच्या ताण-तणावातून तिला हृदयविकाराचा झटका आला आणि त्यातच तिचा मृत्यू झाल्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे.

मात्र तिला शाळेमध्ये आणि घरीही अभ्यासाचा दबाव नसल्याचं तिच्या वडिलांनी सांगितले.

कोरोनानंतर आपल्या सगळ्यांच्याच जीवनशैलीमध्ये बदल झाला आहे. काम करण्याच्या पद्धती आणि शिक्षणाच्या पद्धतीमध्ये देखील मोठे बदल करण्यात आले आहेत. त्यातच मुलांचा असलेला ऑनलाईन अभ्यास आणि त्यामुळे त्यांच्या हातात आलेला मोबाईल या सगळ्या गोष्टींमुळे मुलांच्या आरोग्यावर परिणाम होत आहे. ज्यात मुलं पुरेशी झोपत नसल्याने लहान वयातच मुलांना अनेक दुर्धर आजारांचा सामना करावा लागत असल्याचे आरोग्य अधिकारी सांगतात.

Tags: Shocking

Recent Posts

मुंबई, ठाणे, कल्याणसह नाशिकमध्ये उद्या मतदान

प्रचाराचा थंडावल्या तोफा, आता मतदारांच्या कौलाची प्रतिक्षा मुंबई : देशात लोकसभा निवडणूक सात टप्प्यात होणार…

3 mins ago

परमछाया…

माेरपीस: पूजा काळे अश्मयुगीन किंवा त्याहीपेक्षा अतिप्राचीन काळापासून मनुष्य जन्माचं कोडं अघटित, अचंबित करणारं आहे.…

1 hour ago

कर्करोगाला हरवून ४०० कोटी रुपयांची कंपनी सुरू करणारी कनिका

दी लेडी बॉस: अर्चना सोंडे वयाच्या २३ व्या वर्षी तिला कर्करोग झाला. मात्र तिने हिंमतीने…

1 hour ago

CSK vs RCB: प्लेऑफमध्ये बंगळुरु ‘रॉयल’ एंट्री, चेन्नईचा २७ धावांनी केला पराभव…

CSK vs RCB: आज बंगळुरुच्या चिन्नास्वामी मैदानात चेन्नई सुपर किंग्ज आणि रॉयल चॅलेजर्स बंगळुरु आमने-सामने…

2 hours ago

मराठीचा हक्क

मायभाषा: डॉ. वीणा सानेकर महाराष्ट्र ही शिक्षणाची प्रयोगशाळा आहे, असे म्हटले तर ते चुकीचे ठरणार…

2 hours ago

मुंबईवर वर्चस्व कोणाचे?

स्टेटलाइन: डॉ. सुकृत खांडेकर अठराव्या लोकसभा निवडणुकीसाठी सोमवारी, २० मे रोजी देशाची आर्थिक राजधानी असलेल्या…

2 hours ago