Shivsena and BJP : धनुष्यबाण नव्हे, तर ‘या’ चिन्हावर निवडणूक लढवणार शिवसेना

Share

काय आहे हा मास्टर प्लॅन?

मुंबई : आगामी विधानसभा निवडणुकीत (Vidhansabha Elections) एकहाती सत्ता आणण्याच्या दृष्टीने भाजपचे (BJP) जोरदार प्रयत्न सुरु आहेत. राज्यात अगोदरच शिवसेनेचे (Shivsena) तब्बल ४० आमदार सोबत आले आहेत. आता ‘राष्ट्रवादी’चेही (NCP) आमदार सोबत आल्याने भाजपला अधिक बळ मिळाले आहे. यातूनच भाजप दोन्ही निवडणुकांत आपले यशाचे मिशन फत्ते करण्याच्या तयारीला लागले आहे. त्यातच आता आणखी एका वृत्तामुळे भाजपला प्रचंड फायदा होणार आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची (CM Eknath Shinde) शिवसेना आगामी विधानसभा निवडणुकीत ‘कमळ’ चिन्हावर लढणार असल्याचे निश्‍चित झाले आहे.

शिवसेनेने भाजपच्या चिन्हावर निवडणूक लढविण्याबाबत ठाणे येथील रामभाऊ म्हाळगी प्रतिष्ठानमध्ये भाजपच्या नेत्यांची चिंतन बैठक झाल्याचे सांगण्यात येत आहे. त्या ठिकाणी आगामी विधानसभा निवडणुकीत भाजपतर्फे राज्यात लढविण्यात येणाऱ्या जागांबाबतही चर्चा झाली.

जळगाव जिल्हा आघाडीवर असणार

शिवसेनेने ‘कमळ’ चिन्हावर विधानसभा निवडणुका लढविण्याचा निर्णय घेतल्यास त्यात जळगाव जिल्हा आघाडीवर असणार आहे. जळगाव जिल्ह्यातून तब्बल पाच आमदार शिवसेनेसोबत आहेत. त्यामुळे जळगाव ग्रामीणचे गुलाबराव पाटील, पारोळ्याचे चिमणराव पाटील, पाचोऱ्याचे किशोरआप्पा पाटील, चोपड्याच्या लताताई सोनवणे आणि मुक्ताईनगरचे अपक्ष आमदार चंद्रकांत पाटील हे पाचही आमदार ‘कमळ’ चिन्हावर निवडणूक लढविण्याची शक्यता आहे. त्याबाबतची सर्व रचना पूर्ण झाली असल्याचेही सांगण्यात आले आहे.

भाजपच्या इच्छुक उमेदवारांचे काय?

जळगावच्या पाच मतदारसंघांतून शिवसेनेने ‘कमळ’ चिन्हावर निवडणूक लढवली तर भाजपचे पाचोरा येथील अमोल शिंदे, पारोळा येथील करण पवार, तर जळगाव ग्रामीणमधील चंद्रशेखर अत्तरदे यांच्या तयारीचे काय? असा प्रश्‍नही निर्माण होतो. दरम्यान, पारोळा येथील करण पवार म्हणाले की, “पक्षवाढीचे कार्य करण्याचे आदेश पक्षाच्या वरिष्ठांनी दिले आहेत. त्यानुसार आम्ही कार्य करीत आहोत. आमच्या सोबत कुणी येत असेल आणि पक्ष बळकट होत असेल तर त्यांचे स्वागतच आहे.” त्यामुळे भाजपतील इच्छुकांची निवडणुकीत नेमकी भूमिका काय, याकडेही लक्ष असेल.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

 

Recent Posts

Gurucharan Singh : गेल्या २५ दिवसांपासून बेपत्ता गुरुचरण सिंग अखेर घरी परतले!

कारण सांगताच घरचेही अवाक नवी दिल्ली : 'तारक मेहता का अलटा चष्मा' या लोकप्रिय मालिकेतून…

27 mins ago

Ipl 2024: मुंबई इंडियन्सच्या नावावर या लाजिरवाण्या रेकॉर्डची नोंद

मुंबई: लखनऊ सुपर जायंट्सने मुंबई इंडियन्सला आयपीएल २०२४मधील(ipl 2024) ६७व्या सामन्यात हरवले. लखनऊने पहिल्यांदा फलंदाजी…

2 hours ago

३६५ दिवस चालणार Jioचा हा नवा प्लान, अनलिमिटेड कॉलिंगसोबत फ्री मिळणार FanCode

मुंबई: रिलायन्स जिओकडे(reliance jio) सध्या यावेळे ४६ कोटींपेक्षा अधिक लोकांचा कस्टमर बेस आहे आणि आता…

3 hours ago

सेकंड हँड मोबाईल खरेदी करताय तर घ्या ही काळजी, नाहीतर होईल मोठे नुकसान

मुंबई: स्मार्टफोन्सच्या किंमती बऱ्याच वाढल्या आहेत. आधी जो रेडमी नोट सीरिजमधील फोन १० ते १५…

4 hours ago

चालत्या बसमध्ये लागली आग, ८ जणांचा होरपळून मृत्यू

नूंs: नूंहमध्ये मोठा अपघात घडला आहे. येथे शुक्रवारी रात्री भक्तांनी भरलेल्या बसला अज्ञात कारणामुळे आग…

5 hours ago

मुंबईकरांच्या विकासाला कौल देणारी निवडणूक

सोमवारी २० मे रोजी मुंबई शहरातील सहा लोकसभा मतदारसंघांसाठी मतदान होणार आहे. सहा लोकसभा मतदारसंघांसाठी…

10 hours ago