Friday, April 19, 2024
Homeताज्या घडामोडीShirdi Saibaba trust : शिर्डीच्या साईबाबा संस्थानला १७५ कोटींचा आयकर माफ

Shirdi Saibaba trust : शिर्डीच्या साईबाबा संस्थानला १७५ कोटींचा आयकर माफ

शिर्डी : उच्च न्यायालय व सर्वोच्च न्यायालयाने आयकर अपीलामध्ये कर निश्चित होईपर्यंत देय करास स्थगिती आदेश दिला होता. साई संस्थानमार्फत आयकर अपील दाखल करण्यात आले व आयकर विभागाने अंतीमतः श्री साईबाबा संस्थानला (Shirdi Saibaba trust) धार्मिक व धर्मादाय ट्रस्ट असल्याचे मान्य करुन दक्षिणापेटीतील दानावर आकारणी करण्यात आलेल्या करात सुट दिली. यामुळे मागील तीन वर्षात आकारणी करण्यात आलेल्या १७५ कोटी रुपये आयकरात साईबाबा संस्थानला सूट मिळाली आहे.

आयकर विभागाने सन २०१५-१६ चे करनिर्धारण करताना श्री साईबाबा संस्थान हा धार्मिक ट्रस्ट नसून धर्मादाय ट्रस्ट गृहीत धरुन दक्षिणापेटीत आलेल्या दानावरती ३० टक्के आयकर आकारणी करुन १८३ कोटी रुपये कर भरणा नोटीस दिली होती. आयकर विभागाने मागील दोन वर्षात दक्षिणा पेटीतील दानावर आयकर आकारणी केली नव्हती. तथापि, सदर निर्णयास अनुसरुन मागील दोन वर्षाच्या दक्षिणा पेटीतील दानावर सुध्दा आयकर आकारणीचा निर्णय घेतला व संस्थानला आयकर आकारणीच्या नोटीसा दिल्या. संस्थानमार्फत उच्च न्यायालय व सर्वोच्च न्यायलयात रिट अर्ज दाखल करण्यात आले होते.

याकरीता संस्थानच्या मुख्य कार्यकारी अधिकारी भाग्यश्री बानायत व व्यवस्थापन समितीचे नियोजनाने उच्च न्यायालय व सर्वोच्च न्यायालयामध्ये दिल्लीचे वरिष्ठ वकील सीए एस. गणेश यांनी संस्थानची बाजू मांडली. तसेच याकामी आयकर विभागातील निवृत्त प्रिन्सिपल एस. डी. श्रीवास्तव, माजी विश्वस्त अॅड. मोहन जयकर यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -