मुंबईत सेक्स टुरिझमचा पर्दाफाश

Share

मुंबई (प्रतिनिधी) : मुंबई पोलिसांच्या क्राइम ब्रांचने ‘सेक्स टुरिझम’चा पर्दाफाश केला आहे. यावेळी दोन महिलांना अटक करण्यात आली असून दोन तरुणींचा सुटका करण्यात आली. एक महिला आपल्या सहकाऱ्यासोबत मिळून सेक्स टुरिझम चालवत असल्याची माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी सापळा रचला होता. संबंधित आरोपी महिलेला याआधीही २००२ मध्ये अनैतिक वाहतूक कायद्यांतर्गत अटक करण्यात आली होती.

पोलिसांनी ग्राहक असल्याचा बनाव करत सापळा रचला होता. त्यानंतर आरोपीने गोव्याची ट्रिप आयोजित करत दोन मुलींना सोबत पाठवण्याची तयारी दर्शवली होती, अशी माहिती पोलिसांनी दिली. त्यानंतर पोलिसांनी विमानतळावरच अटकेची तयारी केली होती. तिथे तीन तरुणी, अधिकारी आणि ग्राहकाच्या वेषात असणाऱ्या इतरांना भेटल्या असता कारवाई कऱण्यात आली. यावेळी पैसे आणि विमान तिकीटांची देवाण – घेवाण करण्यात आली. सिग्नल मिळताच तिन्ही तरुणींना ताब्यात घेण्यात आले. चौकशी केली असता पोलिसांना मुख्या आरोपीची माहिती मिळाली. मुख्य आरोपी असणाऱ्या महिलेने डिपार्चर गेटमधून प्रवेश करत बोर्डिंग पास घेतला होता, अशी माहिती पोलिसांनी दिली.

Recent Posts

पाकिस्तानला काँग्रेसचा पुळका

देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशातील सार्वत्रिक लोकसभा निवडणुकीच्या माध्यमातून भाजपा व भाजपाच्या मित्रपक्षाच्या उमेदवारांचा…

2 hours ago

नियोजनबद्ध कचरा व्यवस्थापन

मिलिंद बेंडाळे, पर्यावरण अभ्यासक कचरा किंवा कचरा व्यवस्थापन ही देशातील मोठी समस्या आहे. दिल्ली, मुंबईसारख्या…

2 hours ago

मतदान जनजागृती काळाची गरज

रवींद्र तांबे दिनांक २० एप्रिल, १९३८ रोजी इस्लामपूर येथे केलेल्या भाषणात भारतीय राज्य घटनेचे शिल्पकार…

3 hours ago

MI vs KKR: १२ वर्षांनी वानखेडेवर कोलकाताचा विजय

मुंबई: मुंबईच्या वानखेडे मैदानावर आज मुंबई इंडियन्स आणि कोलकाता नाईट रायडर्स यांच्यात सामना रंगला होता.…

4 hours ago

Narendra Modi : बंगालचे नाव तृणमुलमुळे खराब झाले!

पंतप्रधान नरेंद्र मोदींचा ममता सरकारवर हल्लाबोल कोलकाता : संदेशखालीमध्ये काय घडत आहे हे टीएमसीच्या नेत्यांना…

5 hours ago

Vinod Tawde : ‘आयेगा तो मोदीही’ ही भावना मतदार आणि विरोधकांमध्ये निर्माण करण्यात आम्ही यशस्वी!

पुण्यात विनोद तावडे यांचं वक्तव्य पुणे : एनडीए सरकारची (NDA) दहा वर्षाची कामगिरी आणि २०४७…

5 hours ago