बार्शीत थरकाप उडवणारी घटना, आईने चिमुकलीची गळा आवळून केली हत्या
सोलापूर : सोलापूर (Solapur) जिल्ह्यातील बार्शी तालुक्यात अत्यंत धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. एका २६ वर्षीय महिलेने आपल्या १० महिन्यांच्या मुलीची हत्या (Murder) केल्याचा आरोप असून, मोठ्या मुलीचीही हत्या करण्याचा प्रयत्न केल्याची माहिती समोर आली आहे. मात्र, ६ वर्षांच्या मुलीने "मी चांगला अभ्यास करेन, मोठी होईन, मला मारू नको" असं तिने आईला सांगितलं. मुलीचे हे शब्द ऐकून रुद्रावतरात असलेल्या जन्मदातीने तिला जिवंत सोडलं.
मुंबई : कोकणातील पर्यटनाला नवी चालना देण्यासाठी मुंबई (Mumbai) आणि रत्नागिरीदरम्यान (Ratnagiri) सी-प्लेन सेवा सुरू करण्याच्या हालचालींना वेग आला आहे. महाराष्ट्र ...
या प्रकरणातील आरोपी महिलेचे नाव पूजा योगेश खुर्दामळे असे असून, तिला बार्शी शहर पोलिसांनी अटक (Arrest) केली आहे. शनिवारी सकाळी सुमारे ९.४५ वाजण्याच्या सुमारास ती दोन मुलींसह थेट बार्शी शहर पोलीस ठाण्यात पोहोचली. तिच्या खांद्यावर १० महिन्यांची मुलगी होती. पोलिसांसमोर तिने मुलीची हत्या केल्याची कबुली देत स्वतःला अटक करण्याची मागणी केली. (Crime News)
यानंतर पोलिसांनी तातडीने चिमुकलीला बार्शी ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. मात्र, डॉक्टरांनी तपासणीअंती तिला मृत घोषित केले.
खारजमिनीत वाढ, हवामान बदल आणि वाढत्या नागरिकरणाचा विपरीत परिणाम रायगड : कोकण किनारपट्टीचे मुख्य, पारंपरिक आणि संस्कृतीशी जोडलेले पीक असलेल्या ...
चिमुकलीचा गळा आवळला
पोलिसांनी मोठ्या मुलीची चौकशी केली असता धक्कादायक माहिती समोर आली. वडील कामावर गेल्यानंतर आईने प्रथम लहान मुलीचा गळा दाबून तिला पाण्याने भरलेल्या बादलीत बुडवले. त्यानंतर मोठ्या मुलीच्याही तोंडावर उशी दाबून तिचा जीव घेण्याचा प्रयत्न केला. मात्र, मुलीने जिवाची भीक मागत विनंती केल्यानंतर आरोपी आई थांबली आणि तिचा जीव वाचला.
Nashik Crime News : नाशिकच्या सातपूर परिसरातील परिसरातील गणेश भिका गायकवाड (Ganesh Bhika Gaikwad) या २९ वर्षीय तरुणाने आत्महत्या केली होती. विनयभंगाचा खोटा गुन्हा दाखल करून ...
प्राथमिक चौकशीत पतीकडून होत असलेल्या सततच्या त्रासाला कंटाळून आरोपी महिलेने हे टोकाचे पाऊल उचलल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. या घटनेनंतर संपूर्ण परिसरात हळहळ व्यक्त होत असून, पोलिसांनी भारतीय न्याय संहितेच्या संबंधित कलमांनुसार गुन्हा दाखल केला आहे. घटनेमागील नेमके कारण, कौटुंबिक वाद आणि इतर बाबींचा तपास सुरू असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.






