Sikkim Landslide : सिक्कीममधील (Sikkim) नामची जिल्ह्यात तीस्ता स्टेज-6 जलविद्युत प्रकल्पाच्या कामादरम्यान मोठी दुर्घटना घडली आहे. समारदुंग (झोलुंगे) परिसरातील बोगद्यात भूस्खलन झाल्यानंतर मिथेन वायूची गळती झाल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. या दुर्घटनेत आतापर्यंत 8 कामगारांचा मृत्यू झाला असून, 19 जण अद्याप बोगद्यात अडकल्याची भीती आहे. बचावकार्य युद्धपातळीवर सुरू असले तरी प्रतिकूल परिस्थितीमुळे मोहिमेला मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. (Tunnel Accident)
Pune MHADA : पुण्यात घर घेण्याची मोठी संधी! म्हाडाकडून ताथवडेत 634 सदनिका विक्रीसाठी; 46 लाखांपासून घरांची सुरुवात
पुणे : स्वतःचे घर घेण्याचे स्वप्न पाहणाऱ्या पुणेकरांसाठी म्हाडाने मोठी गृहयोजना जाहीर केली आहे. पुणे गृहनिर्माण व क्षेत्रविकास मंडळाने (म्हाडा) ...
प्राथमिक माहितीनुसार, बोगद्याच्या बाहेर अचानक भूस्खलन झाल्याने मोठ्या प्रमाणात माती आणि दगड कोसळले. त्यावेळी आत काम करणारे अनेक मजूर अडकले. बाहेर आलेल्या काही कामगारांनी बोगद्यात मोठा स्फोटासारखा आवाज ऐकू आल्याचे सांगितले आहे. या घटनेनंतर बोगद्यात मिथेन वायूचे प्रमाण वाढल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. (Methane Gas)
अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, मृत कामगारांचे मृतदेह विविध सरकारी रुग्णालयांत हलवण्यात आले आहेत. नामची जिल्हा प्रशासनाने सांगितले की, सुरुवातीच्या माहितीनुसार 19 कामगार अद्याप बोगद्यात अडकले आहेत. त्यामध्ये प्रकल्पाशी संबंधित काही कर्मचारी आणि इतर कामगारांचाही समावेश आहे. (Sikkim Landslide)
Political News : संसदेचे अधिवेशन सुरू असताना पुण्यात येणार राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार, जाणून घ्या कारण
पुणे : केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आणि राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल पुण्याचा दौरा करणार आहेत. दोन उच्चपदस्थांचा दौरा असल्यामुळे पुण्यात ...
घटनास्थळी एनडीआरएफ, एसडीआरएफ, सिक्कीम पोलीस, अग्निशमन दल, आरोग्य विभाग, एनएचपीसी आणि राज्य आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाची संयुक्त बचाव मोहीम सुरू आहे. मात्र, बोगद्यात मिथेन वायूचे प्रमाण जास्त असल्याने बचाव पथकांनाही आत जाणे धोकादायक ठरत आहे. काही जवानांना वायूचा त्रास झाल्याची माहिती समोर आली आहे. (Sikkim)
बोगद्याचा अरुंद मार्ग, ढिगारा, कमी दृश्यता आणि विषारी वायू यामुळे बचावकार्य (NDRF) अत्यंत कठीण झाले आहे. अडकलेल्या कामगारांना सुरक्षित बाहेर काढण्यासाठी यंत्रणा सर्वतोपरी प्रयत्न करत असून परिस्थितीवर प्रशासनाचे बारकाईने लक्ष आहे.