नवी दिल्ली: दिल्लीतील विवेक विहार परिसरातील चार मजली इमारतीत पहाटे एसीचा स्फोट होऊन भीषण आग लागली. या दुर्घटनेत ९ जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे, तर अनेक जण जखमी झाले आहेत. ही आग दुसऱ्या मजल्यावरील एसीमध्ये झालेल्या स्फोटामुळे लागल्याची प्राथमिक माहिती आहे. पहाटे ३:३० वाजण्याच्या सुमारास लागलेली आग काही क्षणांतच इमारतीच्या वरच्या मजल्यांपर्यंत पसरली.
आग इतकी भीषण होती की अनेकांना स्वतःचा जीव वाचवण्याची संधीही मिळाली नाही. काहींचे मृतदेह बेडवरच आढळले, तर काही जणांचे मृतदेह जिन्यावर जळालेल्या अवस्थेत सापडले. तिसऱ्या मजल्यावर राहणारे काही लोक जीव वाचवण्यासाठी छताकडे पळाले, मात्र छताचा दरवाजा बंद होता. दरवाजा बंद असल्यामुळे बरेच जण अडकले आणि जिन्यावरच त्यांचा मृत्यू झाला.
मुंबई (विशेष प्रतिनिधी) : दहिसर - भाईंदर जोड मार्ग कास्टिंग यार्ड येथे आज प्लॅटफॉर्म कोसळून दोन कामगारांचा मृत्यू झाल्याच्या घटनेची सखोल व निष्पक्ष ...
View this post on Instagram
स्थानिक नगरसेवक पंकज लुथरा घटनास्थळी पोहोचल्यानंतर त्यांनी सांगितले की, दुसऱ्या मजल्याच्या मागील बाजूस पाच मृतदेह सापडले, तर एक मृतदेह मागील भागात आणि तीन वरच्या मजल्यावर आढळले. मृतांची ओळख पटवण्यासाठी डीएनए चाचणी कटण्यात येणार आहे.
भोपाळ : मध्य प्रदेशातील जबलपूर जिल्ह्यात नर्मदा नदी वर बांधलेल्या बर्गी धरणात झालेल्या क्रूझ दुर्घटनेनंतर मदत व बचावकार्य सातत्याने सुरू आहे. ...
दरम्यान, या घटनेमुळे परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले असून स्थानिकांमध्ये सध्या भीती पाहायला मिळत आहे.





