Tuesday, February 24, 2026

फिफा विश्वचषक मेक्सिकोबाहेर खेळवणार ?

फिफा विश्वचषक मेक्सिकोबाहेर खेळवणार ?

ग्वाडालजारा : जूनमध्ये २०२६ मध्ये फिफा विश्वचषक मेक्सिकोत फिफा विश्वचषक होणार आहे. पण ड्रग्ज माफिया नेमेसियो ओसेगुएरा सर्व्हेंटेस उर्फ ​​"एल मेंचो"च्या हत्येनंतर मेक्सिकोच्या अनेक भागात हिंसक निदर्शने सुरू झाली आहेत. ही परिस्थिती लक्षात घेता, मेक्सिको सिटी येथील भारतीय दूतावासाने तेथे राहणाऱ्या भारतीय नागरिकांसाठी एक सूचना जारी केली आहे. आपल्या निवेदनात, दूतावासाने नागरिकांना घरबाहेर पडू नका असे आवाहन केले आहे. प्वेर्टो वल्लार्टा, चापाला आणि ग्वाडालजारा, तामौलिपास राज्यातील रेनोसा आणि इतर नगरपालिका आणि मिचोआकन, ग्वेरेरो आणि नुएवो लिओन या ठिकाणांवरूनही हिंसेचे वृत्त येत आहे. या पार्श्वभूमीवर फुटबॉल फेडरेशनने फिफा विश्वचषक २०२६ मेक्सिकोबाहेर नेण्याचा विचार सुरू केला आहे.

मेक्सिकोमधील सर्वात शक्तिशाली मानली जाणारी सीजेएनजी कार्टेल ही संघटना मेक्सिकोच्या ३२ पैकी २१ राज्यांमध्ये पसरलेली असून त्यांची सदस्य संख्या मोठी आहे. या कार्टेलशी संबंधित ड्रग्ज माफिया नेमेसियो ओसेगुएरा सर्व्हेंटेस उर्फ ​​"एल मेंचो"च्या हत्येनंतर मेक्सिकोच्या अनेक भागात हिंसक निदर्शने सुरू झाली आहेत. कार्टेलचे सदस्य रस्त्यावर येऊन हिंसा करत आहेत. हिंसा थांबवण्यासाठी मेक्सिको सरकारने लष्करी बळाचा वापर सुरू केला आहे. पण अद्याप परिस्थिती पूर्ण नियंत्रणात आलेली नाही. ठिकठिकाणी हिंसा सुरू आहे. या पार्श्वभूमीवर फुटबॉल फेडरेशनने फिफा विश्वचषक २०२६ मेक्सिकोबाहेर नेण्याचा विचार सुरू केला आहे.

जून २०२६ मध्ये फिफा विश्वचषकाचे चार सामने ग्वाडालजारामध्ये आहेत. सध्या या ग्वाडालजारामध्येच मोठ्या प्रमाणात हिंसा सुरू आहे. या हिंसेमुळे देशाची प्रतिमा मलीन झाली आहे. यामुळे ग्वाडालजारामधील सामने मेक्सिकोबाहेर खेळवण्याचा विचार सुरू आहे. हे सामने सह यजमान असलेल्या स्पेन, उरुग्वे आणि कोलंबिया यापैकी एखाद्या देशात खेळवले जाण्याची शक्यता आहे.

Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा


संबंधित बातम्या आणखी वाचा >