Sunday, February 1, 2026

रोहित शेट्टी याच्या घराबाहेर गोळीबार; आरोपी पोलिसांच्या ताब्यात

रोहित शेट्टी याच्या घराबाहेर गोळीबार; आरोपी पोलिसांच्या ताब्यात
Rohit Shetty Mumbai house : बॉलिवूड निर्माता आणि दिग्दर्शक रोहित शेट्टी याच्या मुंबईतील घराबाहेर गोळीबार करण्यात आल्याची घटना घडली. ज्यानंतर मोठी खळबळ उडाली. या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. पोलिस आणि फॉरेन्सिक पथकाची घटनास्थळी चौकशी करताना त्यांना पुरावे सापडले आहेत. परंतु या घटनेमुळे संपूर्ण बॉलीवुडमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. काही दिवसांपूर्वी बॉलीवुडचा प्रसिध्द अभिनेता सलमान खान याच्या घराबाहेर देखील गोळीबार करण्यात आला होता, एवढेच नाही तर त्याच्या घराची रेकी करण्यात आल्याचेही घटना उघडकीस आली.मुंबई पोलिसांनी अवघ्या काही तासात सलमान खान याच्या घरावर गोळीबार करणाऱ्यांना अटक केली. या घटनेला काही दिवस उलटले असतानाच आता रोहित शेट्टी याच्या घराबाहेर गोळीबार करण्यात आला. बिश्नोई टोळीकडून गेल्या काही दिवसांपासून सलमान खानला धमक्या दिल्या जात होत्या. मात्र, रोहित शेट्टी याच्या घराबाहेर नक्की कोणी गोळीबार केला? हा प्रश्न उपस्थित केला जात आहे.   या घटनेबाबत मोठी अपडेट समोर आली आहे रोहित शेट्टी याच्या शेट्टी टॉवर्स या इमारतीवर हा गोळीबार करण्यात आला.मुंबई पोलिसांचे क्राइम ब्रँच पथक व फॉरेन्सिक टीम घटनास्थळी दाखल झाली असून घटनेचा तपास करत असताना त्यांना पुरावे सापडले . रोहित शेट्टी यांच्या घरावर झालेल्या गोळीबार प्रकरणात पुणे कनेक्शन समोर आले आहे.रोहित शेट्टी यांच्या घरावर झालेल्या गोळीबार प्रकरणात पुणे कनेक्शन समोर आले आहे.
Comments
Add Comment