Friday, January 30, 2026

सफाळे आणि केळवे रोड दरम्यान ब्लॉकमुळे रेल्वेसेवेवर होणार परिणाम

सफाळे आणि केळवे रोड दरम्यान ब्लॉकमुळे रेल्वेसेवेवर होणार परिणाम

ठाणे : गर्डर काढण्याच्या कामामुळे येत्या शनिवारी ३१ जानेवारी रोजी सफाळे आणि केळवे रोड दरम्यान ब्लॉक घेण्यात येणार आहे. अप मार्गावर २:१५ ते ३:१५ वाजेपर्यंत आणि डाउन मार्गावर १:४५ ते ५:४५ वाजेपर्यंत ब्लॉक असेल. रविवार १ फेब्रुवारी रोजी, अप मार्गावर ००:३० ते ४:३० वाजेपर्यंत आणि डाउन मार्गावर ००:३० ते ४:०० वाजेपर्यंत हा ब्लॉक असेल. या ब्लॉक दरम्यान शनिवारी सकाळी ७ ची डहाणू रोड – विरार मेमू, व सकाळी ०४:५० ची विरार – डहाणू रोड मेमू या दोन गाड्या रद्द राहतील. विरार – सुरत मेमू ३० मिनिटांनी थांबवण्यात येईल. बरौनी – वांद्रे टर्मिनस एक्सप्रेस १ तास ३० मिनिटांनी, ओखा–मुंबई सेंट्रल मेल एक्सप्रेस ३० मिनिटांनी आणि शनिवारी ३१ जानेवारी रोजी सुरू होणाऱ्या प्रवासासाठी १ तास १० मिनिटांनी थांबवण्यात येईल. भुज – वांद्रे टर्मिनस सुपरफास्ट एक्सप्रेस १ तास ३० मिनिटांसाठी थांबवण्यात येईल. भुसावळ – दादर स्पेशल, शनिवारी ५० मिनिटांसाठी तर अहमदाबाद – वांद्रे टर्मिनस एक्सप्रेस शनिवारी ४५ मिनिटांसाठी थांबवण्यात येईल. गाडी क्रमांक १९१०१ विरार – भरूच एक्सप्रेस, जी ३१ जानेवारी रोजी सुरू होईल, ती पालघर येथून सुरू होईल. त्यामुळे, ही गाडी विरार आणि पालघर स्थानकांदरम्यान अंशतः रद्द राहील.

Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा
संबंधित बातम्या आणखी वाचा >