राष्ट्रीय स्तरावर ऊर्जा क्षेत्र जास्त नफाक्षम
मुंबई : वीज वितरण कंपन्यांच्या चौदाव्या वार्षिक एकात्मिक क्रमवारी आणि मानांकन यादीमध्ये भारतातील वीज वितरण क्षेत्राच्या कामगिरीची सातत्यपूर्ण वाढ अधोरेखित केली आहे. ॲनालिटिक्स व डिजिटल तपशिलासह होत असलेले कामकाज तसेच सातत्यपूर्ण सुधारणा या सर्वांमुळे कार्यक्षमता, दर्जेदार सेवा आणि चांगली आर्थिक कामगिरी साधली गेली आहे.
अखिल भारतीय स्तरावर मानांकित वीज वितरण कंपन्यांनी आर्थिक वर्ष २०२५ मध्ये अत्यंत सकारात्मक असा २,७०१ कोटी रुपये करोत्तर नफा नोंदवला आहे. अशाप्रकारे पहिल्यांदाच हे क्षेत्र लागू असलेल्या पद्धतीने (ॲक्रूवल) नफ्यात आले आहे. त्यापूर्वीच्या म्हणजे २०२४ या आर्थिक वर्षात या क्षेत्राला २७,०२२ कोटी रुपयांचा तोटा झाला होता. या क्षेत्रात केलेल्या पायाभूत सुधारणा, सुधारलेली आर्थिक शिस्त आणि तंत्रज्ञानावर आधारित कामकाजावरील नियंत्रण या सर्व गोष्टींचा एकत्रित परिणाम म्हणून हा बदल झाला आहे.
अदाणी इलेक्ट्रिसिटीने त्यांचे ए प्लस हे राष्ट्रीय मानांकन कायम ठेवले आहे. त्यातून त्यांची प्रत्येक वर्षीची, कामकाजातील, आर्थिक बाबींमधील आणि प्रशासकीय मापदंडामधील सातत्यपूर्ण आणि उत्तम कामगिरी दिसून येते. देशातील अग्रगण्य वीज वितरण कंपनी आणि मुंबईतील प्राथमिक वीज पुरवठ्याचा प्रमुख पर्याय, या अदाणी इलेक्ट्रिसिटीच्या स्थानावर या अहवालामुळे शिक्कामोर्तब झाले. अदानी इलेक्ट्रिसिटीचा भर, आपल्या यंत्रणेत किरकोळ प्रासंगिक सुधारणा करण्यापेक्षा आपल्या कामकाजात संस्थात्मक कामकाजाची शिस्त आणि विश्वासार्हता आणणे तसेच देशाच्या नागरी वितरण क्षेत्रातील मापदंड स्थापन करणारी कंपनी म्हणून आपली भूमिका सिद्ध करणे, हाच असल्याचे दिसून येते.
बीईएसटीने या मानांकन चक्रात चांगली सुधारणा दाखवली असून त्यांना ए प्लस मानांकन मिळाले आहे. त्यायोगे त्यांच्या कामकाजाच्या सर्व मापदंडात त्यांनी चांगलीच वाढ दाखवल्यचे दिसून येत आहे. या अहवालानुसार डिजिटल तपशिलावर आधारित तसेच ॲनालिटिक्सवर आधारित कामकाज आणि स्मार्ट मीटरिंग पद्धती, या बाबींमुळे त्यांना सांगली कामगिरी करण्यास सहाय्य मिळाले आहे. बीएसटी च्या कामकाजातून हे दिसून येते की स्मार्ट मीटर तैनात करण्यावर भर दिल्यामुळे तसेच ॲनालिटिक्सच्या सहाय्याने केलेल्या कामकाजामुळे सार्वजनिक क्षेत्रातील कंपनीची कार्यक्षमता, बिलिंग मधील अचूकता आणि सेवा पुरवठा मोठ्या प्रमाणावर वाढते.
एमएसईडीसीएलने केलेल्या सुधारणा तसेच आधुनिक तंत्रज्ञान आणल्यामुळे त्यांच्या कामकाजात त्वरेने आणि दिसून येण्याजोग्या सुधारणा झाल्या व त्याचा चांगला परिणाम त्यांच्या मोठ्या ग्राहक वर्गावर झाला. आव्हाने कायम असताना स्मार्ट मीटरिंगमध्ये केलेली सातत्यपूर्ण वाढ आणि डिजिटल तपशिलाच्या साह्याने केलेल्या कामकाजामुळे सध्याचा नफा कायम ठेवण्यास आणि नंतर तो वाढवण्यास साहाय्य होईल.
टाटा पॉवरने या सध्याच्या मानांकन चक्रात भाग घेतला नाही आणि त्यामुळे त्यांच्या कामगिरीचे परीक्षण झाले नाही. या अहवालातून दिसलेले राज्यातील चित्र हे एकंदर राष्ट्रीय परिस्थितीशी सुसंगतच आहे. येथे सुधारणांमधील सातत्य, कामकाजातील शिस्त आणि आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर या सर्वांमुळे वीज वितरण क्षेत्रात दीर्घकाळ टिकणारे बदल होत आहेत.
वीज वितरण कंपन्यांच्या चौदाव्या राष्ट्रीय एकात्मिक मानांकनाबाबत अदानी इलेक्ट्रिसिटीची प्रतिक्रिया
या वर्षात देखील आम्हाला अग्रगण्य स्थान मिळणे हे आमच्यासाठी महत्त्वाचे आहे. कारण त्यातून मुंबईकर तसेच देशभरातील ग्राहकांचा आमच्यावर असलेला विश्वास दिसतो. मुंबईकरांची सेवा करण्याचे हे आमचे शंभरावे वर्ष असताना आम्ही शहरवासीयांच्या हातात हात घालून चालत आहोत. शहरातील घरे उजळून टाकण्यासाठी, रुग्णालयांना ऊर्जा देण्यासाठी आणि हे शहर चालते बोलते ठेवण्यासाठी आम्ही शांतपणे पण ठामपणे काम करीत आहोत. ही मान्यता म्हणजे आमच्या शिरपेचातील आणखीन एक मानाचा तुरा असून त्याचे सर्व श्रेय आमच्या ग्राहकांना आणि आमच्या कर्मचाऱ्यांना जाते, जे खरेखुरे मुंबईकर आहेत.






