Saturday, January 24, 2026

मुंबई महापौर पदाच्या निवडणुकीचा कार्यभार प्रधान सचिवांकडे

मुंबई महापौर पदाच्या निवडणुकीचा कार्यभार प्रधान सचिवांकडे

नगरविकास खात्याने केला नियमांत बदल

मुंबई : महापौर पदाच्या निवडणुकीत पिठासीन अधिकारी म्हणून मावळते महापौर किंवा ज्येष्ठातील ज्येष्ठ नगरसेवक अशांची निवड करण्याची तरतूद अधिनियमांमध्ये असली तरी यामध्ये आता नगरविकास खात्याने सुधारणा केली आहे. या अधिनियांत सुधारणा करून पिठासीन अधिकारी म्हणून प्रधान सचिव दर्जाचे अधिकारी असतील अशाप्रकारचा समावेश केला आहे. त्यामुळे विरोधी पक्षाचा माजी महापौर पिठासीन अधिकारी म्हणून बसण्याआधीच भाजपने त्यांची उचलबांगडीचे आदेश काढून तिथे प्रधान सचिव दर्जाच्या अधिकाऱ्याला याचे अधिकार दिल्याने विरोधी पक्षांचे मनसुबेही उधळले गेले आहेत.

महापौर पदाच्या या निवडणुकीत ज्येष्ठातील ज्येष्ठ नगरसेवक म्हणून श्रध्दा जाधव यांचे नाव गृहीत धरले जात होते. पण महापालिका अधिनियमातील सुधारीत तरतुदीनुसार यासाठी प्रधान सचिव दर्जाचे अधिकारी आता पिठासीन अधिकारी पदी बसतील हे आता स्पष्ट झाले आहे. यामुळे भविष्यात निर्माण होणारा संभाव्य वादंग टळला गेला आहे. तसेच यामुळे विरोधी पक्षातील नगरसेवकांला पिठासीन अधिकारी बनवण्यात येणार नसल्याने त्यांनाही आता काही हातचलाखी करता येणार नाही आणि त्यामुळे निवडणूक प्रक्रिया सुरळीत होण्याची शक्यता आहे.

मुंबईच्या महापौरपदासाठी आरक्षण सोडत जाहीर झाल्यानंतर आता या पदासाठीचा मतदानाची प्रक्रिया येत्या ३१ जानेवारी रोजी राबवण्याचा सर्वप्रथम निर्णय घेण्यात आला होता. यासाठी येत्या २७ जानेवारी रोजी उमेदवारी अर्ज दाखल केले जाणार होते. परंतु हा मतदान प्रक्रियेचा कार्यक्रम पुढे ढकलण्यात आला आहे. त्यामुळे याचा कार्यक्रम आता नव्याने जाहीर केला जाणार आहे.

Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा
संबंधित बातम्या आणखी वाचा >