Wednesday, January 21, 2026

निमंत्रण धुडकावल्याने २०० टक्के टॅरिफ लादणार

निमंत्रण धुडकावल्याने २०० टक्के  टॅरिफ लादणार

‘गाझा बोर्ड ऑफ पीस’वरून ट्रम्प यांची फ्रान्सला धमकी

वॉशिंग्टन : अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प टॅरिफ कार्ड प्रत्येक राष्ट्रावर वापरत चालल्याने त्यांचा टॅरिफचा पट्टा आता फ्रान्सच्या दिशेने वळला आहे. ट्रम्प यांच्या ‘गाझा बोर्ड ऑफ पीस’मध्ये सहभागी होण्यास फ्रान्सने नकार दिल्याने २०० टक्के टॅरिफ लादण्याची धमकी ट्रम्प यांनी फ्रान्सला दिली आहे.

फ्रान्सने अमेरिकेचे निमंत्रण नाकारल्यानंतर ट्रम्प यांनी संताप व्यक्त करत फ्रान्सवर थेट २०० टक्के टॅरिफ लादण्याची धमकी दिली आहे. ट्रम्प यांची ‘गाझा बोर्ड ऑफ पीस’ ही महत्त्वाकांक्षी योजना मानली जाते. या योजनेत सामील होण्यास फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष मॅक्रॉन यांनी नकार दिल्याने ट्रम्प चांगलेच संतापले आहेत.

इस्रायल व हमासमधील संघर्षामुळे गाझा पट्टीत काही महिन्यांपूर्वी हाहाकार सुरू होता. हा संघर्ष थांबवण्यासाठी ट्रम्प यांनी पुढाकार घेत शांतता निर्माण व्हावी यासाठी २० कलमी कार्यक्रम तयार केला होता. अमेरिकेच्या या २० कलमी कार्यक्रमाचा प्रस्ताव इस्रायल व हमासने स्वीकारला. त्यानंतर इस्रायल व हमासमधील संघर्ष कायमचा थांबण्यासाठी व गाझामध्ये कायमस्वरूपी शांतता स्थापित करण्यासाठी डोनाल्ड ट्रम्प यांनी ‘गाझा बोर्ड ऑफ पीस’ची स्थापना केली. ट्रम्प यांनी मॅक्रॉन यांच्यावर टीका केली आहे.

Comments
Add Comment