Wednesday, January 21, 2026

ड्रीम-११ आणि माय-११ नंतर गुगलचा बीसीसीआयला आधार

ड्रीम-११ आणि माय-११  नंतर गुगलचा बीसीसीआयला आधार

मुंबई : बीसीसीआय पूर्वी ऑनलाइन गेमिंग कंपन्यांकडून भरपूर उत्पन्न मिळवत होते. मात्र आता अशावेळी बोर्ड हे नुकसान भरून काढण्याचा मार्ग शोधत असतानाच, गुगलने आयपीएलमध्ये प्रवेश केला आहे, ज्यामुळे बीसीसीआयला आता एकप्राकरे लॉटरीच लागणार असल्याचे दिसत आहे. कारण, यामुळे बोर्ड एकाच हंगामात करोडो रुपये कमवू शकणार आहे. बीसीसीआय लवकरच या भागीदारीची घोषणा करू शकते.

एआय आता क्रिकेटच्या जगातही स्वतःची ओळख निर्माण करण्याचा प्रयत्न करताना दिसत आहे. म्हणूनच ते सर्वात मोठ्या क्रिकेट लीग आयपीएलमध्ये प्रवेश करू इच्छित आहे. गुगलचा प्रगत एआय प्लॅटफॉर्म 'जेमिनी' इंडियन प्रीमियर लीग चा अधिकृत भागीदार बनण्याची शक्यता आहे. ही भागीदारी २०२६ ते २०२८ या हंगामांकरिता असेल. या करारामुळे भारतीय क्रिकेटमध्ये कृत्रिम बुद्धिमत्तेचा उपयोग होईल, ज्यामुळे चाहत्यांच्या अनुभवात बदल होण्याची शक्यता आहे. गुगलने या भागीदारीसाठी अंदाजे ₹२७० कोटी गुंतवले आहेत. यामध्ये प्रत्येक आयपीएल हंगामासाठी सुमारे रू.९० कोटींचा समावेश आहे. आयपीएलच्या लोकप्रियतेमुळे, 'जेमिनी' प्लॅटफॉर्म भारतातील प्रेक्षकांपर्यंत पोहोचेल. सामन्यादरम्यान एआय-आधारित आकडेवारी, खेळाडूंची कामगिरी आणि क्षणांचे विश्लेषण आणि डिजिटल प्लॅटफॉर्मवर उपलब्ध होईल. खेळाडूंच्या कामगिरीचे विश्लेषण केले जाईल, ज्यामुळे संघांना धोरण ठरवण्यास मदत मिळेल. चाहत्यांच्या आवडीनुसार सामन्याचे हायलाइट्स आणि सामग्री तयार केली जाईल. एआय-आधारित गेम्स आणि अनुभवाद्वारे चाहत्यांना आयपीएलमध्ये सहभागी करून घेतले जाईल. याआधी ‘चॅट जीपीटी’ने वुमेन्स प्रीमियर लीग २०२६मध्ये भागीदारी केली होती. हा करार बोर्डाने दोन वर्षांसाठी १६ कोटी रुपयांना केला होता. ड्रीम ११ टीम इंडियाचे जर्सी स्पॉन्सर होते. त्यांनी माघार घेतल्यानंतर, अनेक कंपन्यांनी प्रवेश करण्याचा प्रयत्न केला होता. मात्र, शेवटी हा करार शेवटी अपोलो टायर्सकडे गेला, ज्यांनी ५५४ कोटी दिले होते. अर्थात गुगल आणि आयपीएलची ही भागीदारी क्रीडा मनोरंजनाची दिशा ठरवणारी ठरू शकते.

Comments
Add Comment