अलिबाग (प्रतिनिधी) : मुंबईजवळ असलेल्या अलिबागमध्ये आता ‘सेकंड होम’ आणि लक्झरी व्हिलाचा ट्रेंड वेगाने वाढतोय. त्याच पार्श्वभूमीवर क्रिकेटपटू विराट कोहली आणि अभिनेत्री अनुष्का शर्मा यांनी अलिबागमध्ये मोठी जमीन खरेदी केल्याची माहिती समोर आली आहे. उपलब्ध नोंदणी कागदपत्रांनुसार या दोघांनी अलिबागमधील सुमारे ५.१ एकर जमीन ३७.८६ कोटी रुपयांना विकत घेतली आहे. ही जमीन अलिबागमधील झिराड गावात असून त्यांनी ती सोनाली अमित राजपूत यांच्याकडून खरेदी केली आहे. या व्यवहारात शेजारील दोन भूखंडांचा समावेश आहे. या व्यवहाराची नोंदणी १३ जानेवारीला झाली असून व्यवहारासाठी सुमारे २.२७कोटी रुपयांची स्टॅम्प ड्युटी भरल्याचेही सांगण्यात आले आहे.