विरार : महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर बहुजन विकास आघाडी मधून काही माजी नगरसेवकांनी भाजपमध्ये प्रवेश केला. तर भाजपच्या काही पदाधिकाऱ्यांनी बहुजन विकास आघाडीसोबत हात मिळवणी केली. अशाप्रकारे पक्ष बदल केलेल्या काहींना फायदा झाला आहे. बविआमधून भाजपमध्ये पक्षप्रवेश करत माजी नगरसेवक महेश पाटील, ज्योती राऊत, माया चौधरी, सुषमा दिवेकर, प्रदीप पवार, किशोर पाटील, चंद्रकांत गोरीवले या माजी नगरसेवकांनी भाजपकडून उमेदवारी मिळवली. तसेच नेते नितीन ठाकूर सुषमा दिवेकर, धरेंद्र कुलकर्णी, मंजुळा ओगे, योगेश चौधरी यांनीही भाजपमध्ये प्रवेश केला होता. या सर्वांनाच पराभवाचा सामना करावा लागला आहे. तर बविआमधून आलेले प्रदीप पवार, किशोर पाटील, चंद्रकांत गोरीवले, रसिका ढगे, नीलेश चौधरी आणि निम्मी दोशी हे मात्र विजयी झाले आहेत. भाजपमधून नाराज झालेले आणि भाजपचे जुने नेते चंद्रशेखर धुरी यांनी बविआ मध्ये पक्षप्रवेश केला त्यांना बविआने उमेदवारी दिली होती.






