ट्रम्प स्वतःला जगाचे शासक समजू लागलेत. त्यामुळे गोर यांचा भारत दौरा असो की आंतरराष्ट्रीय व्यासपीठ असो, भारताला धडा शिकवण्याचा ट्रम्प यांचा निर्धार आहे. पण, ट्रम्प असो वा कुणीही असो भारत कुणासमोरही झुकणार नाही.
ट्रम्प यांनी भारतासह काही देशांवर ५०० टक्के टॅरिफ लावण्याची धमकी दिली. याचे कारण भारत रशियाकडून तेल खरेदी करत आहे. याचा राग ट्रम्प यांनी भारतावर आणि ब्राझीलसारख्या काही देशांवर काढला. ट्रम्प यांच्या या संतापाचा सर्वात गंभीर परिणाम भारत, चीन आणि ब्राझील या देशांना बसणार. त्यासाठी गोर जेव्हा भारत दौऱ्यावर आले तेव्हा त्यांनी भारतावर 'सँक्शनिंग ऑफ रशिया' कायद्याला पाठिंबा देण्यासाठी भारतावर दबाव आणला नाही, पण त्यांचा हेतू आणि बोलण्याचा मथितार्थ तोच होता. ट्रम्प यांचा भारतावर ५०० टक्के टॅरिफ लावण्याचा कट असंयुक्तिक तर आहेच, पण लहरीपणाचे द्योतक आहे. ट्रम्प स्वतःला जगाचे शासक समजू लागलेत. त्यामुळे गोर यांचा भारत दौरा असो की आंतरराष्ट्रीय व्यासपीठ असो. भारताला धडा शिकवण्याचा ट्रम्प यांचा निर्धार आहे. पण, ट्रम्प असो वा कुणीही असो भारत कुणासमोरही झुकला नाही. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासारखा तगड्या नेत्याच्या हातात भारताची सूत्रे आहेत. त्यामुळे मोदी यांचा भारत-अमेरिकेच्या या दंडेलशाहीपुढे झुकणार नाही हे स्पष्ट आहे. हेच गोर यांच्या दौऱ्यानंतरही भारताने दाखवून दिले. ट्रम्प यांच्या या दंडेलशाहीचे कारण स्पष्ट आहे.
ट्रम्प यांना रशिया आणि युक्रेन यांच्यातील युद्ध थांबवण्याचे श्रेय हवे. भारत आणि पाकिस्तान यांच्यातीलही युद्ध संपवण्याचे श्रेय घेण्याचा त्यांनी अनेकदा प्रयत्न केला, पण भारताने त्यांच्या या बनवेगिरीला भीक घातली नाही. आता गोर यांच्या दौऱ्याच्या निमित्ताने भारतावर आणखी एक दबाव आणण्याचा प्रयत्न ट्रम्प यांनी केला. पण गोर यांचा हा प्रयत्न भारताच्या ठाम नकारामुळे हाणून पाडला. जगभरातील युद्धे रोखून शांतता पुरस्कार मिळवण्याची ट्रम्प यांची धडपड अव्याहत सुरू आहे, पण तिला यश येत नाही. म्हणून ट्रम्प या पद्धतीने उत्तर देण्याचा प्रयत्न करत आहे. गोर यांचा दौरा कितपत यशस्वी झाला, ही बाब अलाहिदा. पण ट्रम्प यांनी असा विचार केला पाहिजे, की ५०० टक्के टॅरिफ लावला तर भारत आणि चीनमधून आयात केल्या जाणाऱ्या वस्तू अमेरिकेत प्रचंड महाग होतील. अमेरिकेत यादवी युद्ध होईल आणि अमेरिकन नागरिक ट्रम्प प्रशासनाविरुद्ध युद्ध सुरू करतील. तसेही अमेरिकेत कामगारांचे वेतन महाग असल्याने तेथे उत्पादन खूप महाग पडते. या प्रकारे टॅरिफ वाढवल्याने अमेरिकन नागरिकांचा राग आपल्याच म्हणजे ट्रम्प यांच्याविरोधात उसळेल. तसेही ट्रम्प यांच्या मनमानी पद्धतीने टॅरिफ लावण्याच्या या प्रकाराला अमेरिकन कनिष्ठ न्यायालयाने आधीच ठोकरून लावले. भारत-अमेरिका व्यापारविषयक बोलणी अद्याप पूर्ण झालेली नाहीत. मोदी यांना अत्यंत विचाराने आणि आर्थिक आणि राजनैतिक पैलूंचा सर्व प्रकारे विचार करून निर्णय घेतला पाहिजे. मोदी सरकारने सध्या आर्थिक स्थैर्य यांचा विचार करून निर्णय घ्यायला हवा. ट्रम्प यांच्या धमकीपुढे घाबरून जाऊ नये. ट्रम्प यांच्या टॅरिफच्या तोडीसतोड म्हणून भारताने ब्रिक्स आणि ट्रम्प यांच्या टॅरिफने असेच जे पोळलेले देश आहेत त्यांच्याबरोबर येऊन काम केले. ट्रम्प जेव्हा म्हणतात, की सत्तेमुळे माझ्या नैतिकतेला चाप लावला आहे, तेव्हा समजून जा; की ट्रम्प यांचे हे विधान म्हणजे ढोंगीपणाचे द्योतक आहे. पण त्याविरोधात कारवाई करताना ट्रम्प यांच्या आततायी विधानांकडे लक्ष न देता भारताने आपले वास्तव पाहिले पाहिजे. दोन्ही सेन्सेक्स आणि निफ्टी याच आठवड्यात २.५ टक्क्यांनी कोसळले. परदेशी गुंतवणूकदारांनी १.३ अब्ज डॉलरची गुंतवणूक देशातून बाहेर काढून नेली. रुपया कोसळून ९०.१६च्या वर उतरला आणि यात जागतिक अनिश्चित वातावरण भर टाकत आहे. रशिया आणि युक्रेन यांच्यात युद्ध संपुष्टात येण्याची चिन्हे नाहीत आणि इराण आणि व्हेनेझुएलाने आंतरराष्ट्रीय अस्थिर परिस्थितीत आपल्या परीने भर टाकली. पण ट्रम्प यांनी धमकी दिली असली तरी भारतासमोर काही पर्याय आहेत. त्यापैकी एक आहे तो म्हणजे निर्यात बाजारपेठेत विविधता आणणे. त्यासोबत मेक्सिको, चीन आणि ब्रिक्स देशांबरोबर भारताने व्यापार वाढवण्याची तयारी सुरू केली पाहिजे. त्याद्वारेच भारत ट्रम्प यांच्या दादागिरीला उत्तर देऊ शकतो. भारताचा ब्रिटनबरोबर मुक्त व्यापार करार झाला. तेव्हापासूनच ट्रम्प यांचा पारा चढला आणि भारताला कसा धडा शिकवू असे त्यांना झाले. ट्रम्प यांनी टॅरिफ भरमसाट प्रमाणात लावण्यासाठी जी धमकी दिली, त्यात आणखी एक आव्हान आहे. ते म्हणजे नवीन बाजारपेठा मिळवण्याचा खर्च.
पण तातडीचा उपाय हाच आहे, की ट्रम्प यांच्या दादागिरीला भारताने जशास तसे उत्तर दिले पाहिजे. त्यासाठी भारताने ब्रिक्स देशांशी व्यापक समझोते केले पाहिजेत आणि भारत आणि इंग्लंडच्या धर्तीवर ब्रिक्स देशांशीही तशाच पद्धतीने करार केल्यास ट्रम्प यांचे नाक आपोआप दाबले जाईल. भारताने नुकतीच अमेरिकन ट्रेझरी बाँडमधील आपली गुंतवणूक झपाट्याने कमी केली. यामुळे ट्रम्प यांच्या नाकातोंडात पाणी गेले. हा धक्का ट्रम्प आणि डॉलरसाठी प्रचंड मानला जातो. भारताने गुंतवणुकीचे अन्य पर्याय शोधलेत. एका आकडेवारीनुसार भारताने ३१ ऑक्टोबर २०२४ ते ३१ ऑक्टोबर २०२५ दरम्यान अमेरिकन गुंतवणूक तब्बल २१ टक्क्यांनी कमी केली. आता टॅरिफनंतर ही गुंतवणूक झपाट्याने कमी होत आहे. गोर यांच्या दौऱ्याचा काही उपयोग झाला नाही. उलट भारताचा ट्रम्प यांच्या दादागिरीपुढे न झुकण्याचा निर्धार वाढला. दुसरा धक्का भारताने काही देशांसोबत रुपयांमध्ये व्यवहार सुरू केले आणि हाही ट्रम्प यांना धक्का मानला जातो. सिल्व्हर लायनिंग अशी, की भारताची अर्थव्यवस्था आणखी मजबूत आहे. हे मत भारतीयाचे नाही; न्यूयॉर्क टाइम्सने हे वृत्त प्रसिद्ध केले. अमेरिकेतच ट्रम्प यांच्या टॅरिफच्या निर्णयाला कसा विरोध होत आहे हे समजून येते. गोर यांच्या दौऱ्याचा उपयोग भारत आणि अमेरिका यांच्यातील व्यापार युद्ध कमी करण्याच्या दृष्टीने तर झाला नाही. पण अमेरिका हे समजून जाईल, की भारताला आता दादागिरीने नमवणे शक्य नाही. येथे नरेंद्र मोदी यांचे सरकार आहे हे त्यानी लक्षात घेतले तरी पुरे.






