Monday, January 12, 2026

हिंदूंमध्ये फूट पाडण्यासाठीच ठाकरे बंधू एकत्र

हिंदूंमध्ये फूट पाडण्यासाठीच ठाकरे बंधू एकत्र

मंत्री नितेश राणे यांनी घेतला ठाकरे बंधूंचा समाचार

ठाकरे पुत्रांपेक्षा उत्तर भारतीय चांगली मराठी भाषा बोलतात

मराठीची सक्ती करायची असेल तर मदरशांमध्येही करा

मुंबई : हिंदूंमध्ये फूट पाडण्यासाठी दोन्ही ठाकरे बंधू एकत्र आले आहेत. ठाकरे बंधू मराठीच्या नावावर राजकारण करत आहेत. आदित्य आणि अमित ठाकरे यांना जेवढी मराठी बोलता येत नाही, त्यापेक्षा अधिक चांगली मराठी आपल्या उत्तर भारतीय हिंदू बांधव आणि त्यांची मुले बोलतात. मराठी सक्ती गरीब उत्तर भारतीय लोकांवरच का केली जाते असा सवाल करत मराठीची सक्ती करायचीच असेल, तर मग ती मदरशांमध्येही व्हायला पाहिजे, मदरशांमध्येही मराठी भाषा शिकवली पाहिजे सांगत मत्सव्यवसाय व बंदरे विकास मंत्री नितेश राणे यांनी ठाकरे बंधूंच्या मराठी मुद्याचा समाचार घेतला. ठाकरे बंधूंना मत म्हणजे पाकिस्तानात बसलेल्या त्यांच्या अब्बाला मत असेही त्यांनी यावेळी सांगितले.

गोरेगाव गोकूळधाममधील भाजप -शिवसेना महायुतीच्या उमेदवार प्रीती सातम यांच्या प्रचारासाठी गोरेगाव पूर्व येथील कन्यापाडा येथील चौकसभेत ते बोलत होते. कन्यापाडा परिसरात त्यांचे स्वागत 'जय श्री राम' घोषणांनी झाले. कन्यापाडा ते व्यासपीठापर्यंतचा परिसर जय जय श्रीरामाच्या नामघोषांनी दणाणून गेला होता.

हे हिंदू राष्ट्र, हिंदुत्व विचारधारेचे राष्ट्र आहे, हा महाराष्ट्र, ही मुंबई हिंदुत्वाच्या विचारधारेची आहे. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री हे आपल्या हिंदू समाजाचे आहेत, त्यामुळे हिंदू समाजाचे रक्षण करणे हे आपले कर्तव्य आहे. हिंदूंकडे जर कोणी वाकड्या नजरेने पाहत असेल तर त्यांना जशास तसे उत्तर देण्यात आमची पीएचडी झालेली आहे. या हिंदू राज्यात, हिंदू समाजाकडे वाईट नजरेने पाहणाऱ्यांना आम्ही खपवून घेणार नाही, असे राणे म्हणाले. निवडणूक असो वा नसो, काही चुकीचा त्रास जर आमच्या हिंदूंना देणार असाल, तर जसे आज निवडणुकीसाठी मत मागायला आलो आहे, तसेच पुढील वेळेला सांगणारही नाही आणि अशा जागेवर येईन की शुक्रवारचाही त्रास होईल. हा सर्व प्रकार माझ्या ५२ वॉर्डांत करण्याची हिंमत करू नका. ही आमची सातम बहीण एकटी नाही, तिच्या मागे आम्ही आहोत, हे आज मी इथून सांगून जात आहे. आपल्याला कोणतीही चिंता करण्याची गरज नाही. आज निवडणूक असू द्या किंवा नसू द्या आपल्याला हिंदू बनून जे करायचे ते करा, जो सण आपल्याला करायचा तो जोरात साजरा करा. हे आज मी आपल्याला सांगून जात आहे. आमच्या या मुंबईमध्ये फक्त आय लव्ह महादेव म्हणणारेच राहू शकतात. बाकी कुणालाच इथे जागा नाही, असेही नितेश राणे यांनी निक्षून सांगितले. त्यामुळे कुणाला घाबरवणे, धमकावणे अशा प्रकारची मस्ती यापुढे इथे चालणार नाही. १६ तारखेनंतर जो हिशोब करायचा असेल तो आम्ही चुकता करणार. जे हिंदू समाज मला ऐकत आहेत त्यांनी आता कोणत्याही प्रकारचा भीती बाळगायची गरज नाही, असा विश्वासही नितेश राणे यांनी जनतेला दिला.

Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा
संबंधित बातम्या आणखी वाचा >