नवी दिल्ली : इस्रोचे २०२६ मधील पहिले प्रक्षेपण अयशस्वी झाले. PSLV-C62 मोहिमेपूर्वी, गेल्या वर्षी C61 देखील अयशस्वी झाले. यावेळी, रॉकेट यशस्वीरित्या प्रक्षेपित झाले. पण तिसऱ्या टप्प्याची टप्प्याची माहिती नियोजीत वेळेपेक्षा विलंबाने मिळाली. चौथ्या टप्प्याला सुरुवात झाली पण नंतर अपडेट मिळणे थांबले. वारंवार संपर्काचा प्रयत्न झाला. मात्र PSLV-C62 चा नियंत्रण कक्षाशी तुटलेला संपर्क पुन्हा सुरळीत झाला नाही.
इस्रोने दिलेल्या माहितीनुसार तिसऱ्या टप्प्यात आलेल्या एका समस्येमुळे रॉकेटने मार्ग बदलला आणि PSLV-C62 चा नियंत्रण कक्षाशी संपर्कच तुटला. यामुळे रॉकेटमधून अंतराळात पाठवलेले १६ उपग्रह बेपत्ता झाले आहेत.
इस्रोच्या नियंत्रण कक्षाशी असलेला PSLV-C62 चा संपर्क तुटल्यामुळे १६ उपग्रह अंतराळात बेपत्ता झाले आहेत.
प्रक्षेपण यशस्वी झाले असते तर १६ उपग्रह अंतराळात स्थिरावले असते. यात चेन्नईच्या ऑर्बिटएड एरोस्पेसचा पहिला उपग्रह आयुलसॅटचाही समावेश झाला असता. आयुलसॅटमुळे अंतराळात उपग्रहांचे कक्षेत इंधन भरण्याचे तंत्रज्ञान आणखी विकसित झाले असते. भारताचा पहिला व्यावसायिक इन-ऑर्बिट डॉकिंग आणि इंधन भरण्याचा इंटरफेस तयार झाला असता. उपग्रहातील एका टाकीतून दुसऱ्या टाकीत इंधन (प्रोपेलंट) स्थानांतरित करणे, शक्ती स्थानांतरित करणे, डेटा स्थानांतरित करणे यासाठीचे तंत्रज्ञान विकसित झाले असते.





