Friday, January 9, 2026

ठाण्यात ११४ उमेदवार अब्जाधीश !

ठाण्यात ११४ उमेदवार अब्जाधीश !

ठाणे : येत्या १५ जानेवारी रोजी ठाणे महानगरपालिकेची सार्वत्रिक निवडणूक होत असून या निवडणुकीसाठी तब्बल ६४९ उमेदवार रिंगणात उतरले आहेत. निवडणूक आयोगाकडे सादर करण्यात आलेल्या शपथपत्रांच्या तपासणीत धक्कादायक माहिती समोर आली असून यापैकी ११४ उमेदवार हे अब्जाधीश असल्याचे स्पष्ट झाले आहे. या श्रीमंत उमेदवारांमध्ये एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेतील उमेदवारांचे प्रमाण सर्वाधिक आहे.

मिळालेल्या माहितीनुसार शिंदे गटाच्या परिषा प्रताप सरनाईक (वॉर्ड ५ क, ठाणे) यांनी आपल्या शपथपत्रात तब्बल ३८१ कोटी रुपयांची मालमत्ता असल्याची नोंद केली आहे. त्यांच्यानंतर बाबाजी पाटील (वॉर्ड २९ क, मुंब्रा) यांची १२६ कोटी रुपयांची मालमत्ता असून कळव्यातील मंदार केणी (वॉर्ड २३ ड) यांच्याकडे १०५ कोटी रुपयांची संपत्ती असल्याचे जाहीर झाले आहे.

कोट्यधीश उमेदवारांमध्येही विविध पक्षांचे प्रतिनिधी आहेत. शिवसेनेचे हणमंत जगदाळे (६३.४४ कोटी) आणि मनाली पाटील (६१.६८ कोटी), भाजपच्या प्रतिभा मढवी (४३.५७ कोटी) व नंदा कृष्णा पाटील (५१.२० कोटी), ठाकरे गटाच्या नंदिनी विचारे (४१.८७ कोटी), महेश्वरी तरे (२३.४४ कोटी) व कविता पाटील (५५.८२ कोटी), मनसेच्या रेश्मा पवार (१७.७८ कोटी) तसेच अपक्ष प्रमिला केणी (६१.६८ कोटी) यांचासमावेश आहे.

याउलट, ठाणे महापालिका निवडणुकीतील सर्वात कमी उत्पन्न असलेले उमेदवार मुंब्रा भागातील असून एका उमेदवाराने अवघे २० हजार ५०२ रुपयांचे वार्षिक उत्पन्न दाखवले आहे. आता मतदार कोणाला पसंती देतात, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Comments
Add Comment