Friday, January 2, 2026

ओम सिद्धी साई दिंंडी कोकण श्रीक्षेत्र शिर्डीकडे रवाना

ओम सिद्धी साई दिंंडी कोकण श्रीक्षेत्र शिर्डीकडे रवाना

३०० किमीच्या पदयात्रेत ४०० साईभक्त सामील

प्रमोद जाधव माणगाव : गेली १३वर्षाची परंपरा आणि १४ व्या वर्षात पदार्पण करत अखंड साईभक्ती ओम सिद्धी साई दिंडी कोकण माणगाव शहरातील नाणोरे ते श्री क्षेत्र शिर्डीकडे जाणाऱ्या पदयात्रेचा प्रारंभ सकाळी ११ वाजता झाला. या पदयात्रेतील श्री साई पालखी व पदयात्रा सकाळी नाणोरे येथील साई मंदिर येथून सुरुवात झाली. त्यानंतर नाणोरेचे ग्रामदैवत जनी बापूजी मंदिराला प्रदक्षिणा देत व नाणोरे गावाला प्रदक्षिणा देत ही पालखी पदयात्रा मुंबई गोवा महामार्गवरून श्री दत्त मंदिर माणगाव श्री साई मंदिर विकास कॉलनी ते दशरथ गावडे यांचे निवासस्थान व त्यांनतर हॉटेल साईराम तद्नंतर निजामपूर येथे रात्री वस्ती अशी पदयात्रा श्री क्षेत्र शिर्डी कडे रवाना होणार आहे.

सुमारे ३०० किमी पायी प्रवास असणाऱ्या पदयात्रेत सुमारे ४०० साईभक्त सामील आहेत तर त्यापैकी १८० साईभक्त पायी प्रवास करणार आहेत.या परंपरागत दिंडी चे नियोजन संस्थापक अशोक वाढवळ यांच्या प्रेरणेने साई चरणरज समाधान उतेकर,कान्हा महाराज, कार्यकारिणी अध्यक्ष सुभाष उतेकर, उपाध्यक्ष गजानन वाढवळ यांच्या सह माणगाव तालुक्यातील बहुसंख्य साईभक्तांनी या पालखी सोहळ्याचे सुसज्ज नियोजन व व्यवस्थापन केले आहे. या पदयात्रेचा प्रवास सुमारे ८ दिवसांचा असून प्रतिदिन ४० किमी अंतर साईभक्त कापणार आहेत.ही साईपालखी निजामपूर नंतर २ जानेवारी रोजी डोंगरवाडी विंझाई देवी मंदिर ताम्हिणी.३जानेवारी मुळशी पौड,४ जानेवारी पौड ते देहू,५ जानेवारी राजगुरू नगर अवसर फाटा मंचर,६ जानेवारी आळेफाटा धारगाव,७ जानेवारी साकुरफाटा ते संगमनेर ,८ जानेवारी कवठे कमळेश्वर ते नांदूरखी,९ नांदूरखी ते श्री क्षेत्र साईमंदीर शिर्डी असा असणार आहे.या पालखी च्या मिरवणुकीचे खास आकर्षण असते ते पद यात्रेत सामील झालेला नाचणारा घोडा. ही श्री साई पालखी पदयात्रा सामाजिक एकोपा टिकावा, समाज सलोखा निर्माण व्हावा,सर्वधर्म सहिष्णुतेची शिक्षण समाजात रुजावी,साईबाबांची महती व चमत्कार जनमानसात रुजावे,हा उद्देश साईदिंडी च्या माध्यमातून आम्ही समाजात रुजवण्याचा आम्ही श्री साई प्रेरणेने प्रयत्न करत असल्याचे मत साईचरणरज समाधान उतेकर व पालखी सोहळा अध्यक्ष महेश शिर्के यांनी पत्रकारांशी बोलताना व्यक्त केले. दरवर्षी पेक्षा या वर्षी ओम सिद्धी साईदिंडी कोकण माणगाव ला हजारो माणगांवकर आणि शेकडो साईभक्त उपस्थित होते माणगाव तालुक्यातील बाजारपेठ,विकासकॉलनी, साईनगर ,दत्तनगर, गणेशनगर या विभागातील आबालवृद्धानी पालखीचे दर्शनघेत पुष्पसुमनानी स्वागत केले.तसेच आदर्श समता नगर माणगांव विकास कॉलनी तसेच माणगांव शहरातील साईनगर येथे सुरेश खाडे यांच्या निवासस्थानासमोर साईनगर मधील असंख्य भाविकांनी पदयात्रेतील पालखीचे दर्शन घेत मनोभावे पूजा केली.

Comments
Add Comment