Saturday, January 3, 2026

भायखळ्यात यामिनी जाधव यांच्या नावावर नोंदवला गेला विक्रम

भायखळ्यात यामिनी जाधव यांच्या नावावर नोंदवला गेला विक्रम

तिन्ही प्रकारच्या निवडणुकांमध्ये उमेदवारी मिळवणाऱ्या पहिल्या उमेदवार

मुंबई (विशेष प्रतिनिधी) : मुंबई महापालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीत प्रभाग क्रमांक २०९मधून शिवसेनेच्या यामिनी जाधव यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. यामिनी जाधव यांनी हा उमेदवारी अर्ज भरत एकप्रकारे आपल्या नावावर विक्रम नोंदवला आहे. लोकसभा, विधानसभा आणि महापालिका या तिन्ही वेगवेगळ्या प्रकारच्या निवडणुकीत उमेदवारी अर्ज भरण्याचा विक्रम भायखळा विधानसभेतील उमेदवार यामिनी जाधव यांनी आपल्या नावावर नोंदवला आहे. आजवर अशाप्रकारचा विक्रम कोणत्याही उमेदवारावर नाही. अशाप्रकारे तिन्ही प्रकारच्या निवडणुकांमध्ये उमेदवारी अर्ज भरणाऱ्या यामिनी जाधव या एकमेव ठरल्या आहेत.

मुंबई महापालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीत यामिनी जाधव यांनी शिवसेनेच्यावतीने प्रभाग क्रमांक २०९मधून उमेदवारी अर्ज सादर केला आहे. तर त्यांच्या विरोधात मनसेच्या हसीना माहिमकर यांना उमेदवारी देण्यात आली आहे.उबाठा मनसेच्या युतीमध्ये ही जागा उबाठाने न लढवता मनसेला सोडली. प्रभाग क्रमांक २०९ हा माजी नगरसेवक यशवंत जाधव यांचा बालेकिल्ला मानला जात आहे. हा प्रभाग महिला आरक्षित झाल्याने जाधव यांनी पुन्हा एकदा यामिनी जाधव यांना निवडणूक रिंगणात उतरवले आहे. त्यामुळे लोकसभा, विधानसभा आणि त्यानंतर महापालिका निवडणुकीतही यामिनी जाधव यांनी निवडणूक रिंगणात उतरलेल्या पहायला मिळत आहे.

यामिनी जाधव यांना लोकसभा २०२४च्या निवडणुकीत शिवसेनेच्यावतीने उमेदवारी देण्यात आली होती. त्यामध्ये यामिनी जाधव यांचा पराभव उबाठा शिवसेनेचे अरविंद सावंत यांनी केला होता. तर विधानसभा निवडणूक २०२४ मध्ये शिवसेनेच्यावतीने यामिनी जाधव यांना पुन्हा उमेदवारी देण्यात आली होती. या निवडणुकीत उबाठाचे मनोज जामसूतकर यांनी यामिनी जाधव यांचा पराभव केला होता. त्यामुळे सलग दोन निवडणुकांमध्ये उमेदवारी मिळवल्यानंतर पराभव झाल्यानंतर आता मुंबई महापालिकेच्या सन २०२५ -२६च्या निवडणुकीत प्रभाग २०९मध्ये पुन्हा उमेदवारी देण्यात आली आहे.

लोकसभेतील भायखळा विधानसभेतील मतदान

अरविंद सावंत(उबाठा) :८६,८८३

यामिनी जाधव(शिवसेना) :४०,८१४

भायखळा विधानसभा निकाल २०२४

मनोज जामसूतकर (उबाठा) :८०,१३३

यामिनी जाधव(शिवसेना) :४८,७७२

Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा