मुंबई: नवीन वर्षाच्या पहिल्याच आठवड्यात भाविकांच्या श्रद्धेचा महासागर उसळणार असून, त्या महासागराला सुरक्षित, सुलभ आणि सुव्यवस्थित साथ देण्यासाठी महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाची ‘लालपरी’ पूर्ण ताकदीने सज्ज झाली आहे. श्री पाल-खंडोबा यात्रा २०२६ साठी एसटी महामंडळाने अत्यंत सूक्ष्म, शिस्तबद्ध व सर्वसमावेशक नियोजन केली असल्याची माहिती परिवहन मंत्री तथा एसटी महामंडळाचे अध्यक्ष प्रताप सरनाईक यांनी दिली. दि. १ ते ८ जानेवारी २०२६ या कालावधीत होणाऱ्या या पवित्र यात्रेसाठी सातारा विभागातील सातारा, कराड, कोरेगाव, फलटण, वाई, पाटण, दहिवडी, महाबळेश्वर, मेढा, पाराव- खंडाळा व वडूज या आगारांतून तसेच सांगली विभागाकडून मोठ्या प्रमाणावर अतिरिक्त बसेस उपलब्ध करून देण्यात येणार आहेत, जेणेकरून भाविकांना वेळेत, सुरक्षित आणि आरामदायी प्रवासाचा लाभ घेता येईल. प्रवास सुरळीत व्हावा यासाठी वाहनांची तांत्रिक तपासणी, चालक-वाहकांचे नियोजन व विश्रांती, इंधन उपलब्धता, स्वच्छता, पिण्याचे पाणी, सुरक्षा व्यवस्था आणि वाहतूक नियोजन या सर्व बाबींवर विशेष भर देण्यात आला आहे. यात्रेच्या संपूर्ण कालावधीत स्वतंत्र यात्रा प्रमुख, सहाय्यक अधिकारी, तांत्रिक कर्मचारी आणि सुरक्षा अधिकारी नियुक्त करण्यात आले असून नियंत्रण कक्ष २४ तास कार्यरत राहणार आहे.
किरीट सोमय्यांचा दावा; मुंबईला मुस्लिम करण्याचा डाव सुरू असल्याचा आरोप मुंबई: "मुंबईत हिंदूंचा जन्मदर १.३ टक्के तर मुस्लिमांचा जन्मदर २.६ टक्के म्हणजे ...






