Tuesday, December 30, 2025

टी-२० सामन्यात सोनम येशेचा ८ बळींचा जागतिक विक्रम

टी-२० सामन्यात सोनम येशेचा ८ बळींचा जागतिक विक्रम

भूतानच्या फिरकीपटूने म्यानमारविरुद्ध रचला इतिहास; ४ षटकांत दिल्या ७ धावा

भूतान : फिरकीपटू सोनम येशे याने इतिहास रचला आहे. २२ वर्षीय सोनम, टी-२० क्रिकेटच्या एका सामन्यात ८ बळी घेणारा जगातील पहिला गोलंदाज ठरला आहे. येशे याने आपल्या कोट्यातील चार षटकांत ७ धावा देऊन ८ बळी घेतले. यात एक निर्धाव षटकही समाविष्ट होते. सोनमने म्यानमारविरुद्ध २६ डिसेंबर रोजी गेलेफू येथे खेळल्या गेलेल्या तिसऱ्या टी-२० आंतरराष्ट्रीय सामन्यात ८ बळी घेतले.

भूतान क्रिकेटने सोशल मीडिया प्लॅटफॉर्म X वर लिहिले - 'हा एक अविस्मरणीय अनुभव आहे. सोनम येशेची ४ षटकांत ८/७ ची कामगिरी जागतिक विक्रम ठरली आहे. 'टी-२० क्रिकेटमध्ये पहिल्यांदाच एखाद्या गोलंदाजाने एका सामन्यात ८ विकेट घेतल्या आहेत. यापूर्वी नेदरलँड्सच्या कोलिन एकरमनने २०१९ मध्ये आणि अफगाणिस्तानच्या तस्कीन अहमदने २०२५ मध्ये एका सामन्यात ७-७ विकेट घेतल्या होत्या. त्याचबरोबर, टी-२० आंतरराष्ट्रीयमध्येही दोन गोलंदाजांनी ७-७ विकेट घेतल्या आहेत. आतापर्यंत मलेशियाच्या सयाजरुल इद्रुसने २०२३ मध्ये चीनविरुद्ध ८ धावांत ७ बळी घेतले होते.

बहरीनच्या अली दाऊदने २०२५ मध्ये भूतानविरुद्ध १९ धावांत ७ बळी घेतले होते. भूतानने म्यानमारला ८३ धावांनी हरवले. सोनम येशेच्या शानदार गोलंदाजीमुळे भूतानने म्यानमारला १२८8 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना केवळ ४५ धावांवर ऑलआउट केले. भूतानने हा सामना ८२ धावांनी जिंकला. पाच सामन्यांच्या टी२० मालिकेत भूतान सध्या ४-० ने आघाडीवर आहे. या मालिकेत सोनम येशेने आतापर्यंत ४ सामन्यांत १२ बळी घेतले आहेत. मालिकेतील शेवटचा सामना सोमवारी खेळवला जाईल. सोनम येशेने जुलै २०२२ मध्ये मलेशियाविरुद्ध टी-२० आंतरराष्ट्रीय पदार्पण केले होते. तेव्हापासून आतापर्यंत त्याने ३४ सामन्यांच्या ३३ डावांमध्ये ३७ बळी घेतले आहेत. त्याची सरासरी १७.३७ आणि इकोनॉमी ५.६९ आहे. त्याच्या नावावर टी२० क्रिकेटमध्ये एक चार बळी आणि एक पाच बळी घेण्याचा विक्रमही नोंद आहे.

Comments
Add Comment