राजस्थान: राजस्थानमधून ड्रग्ज तस्करीबाबत एक महत्त्वाची बातमी समोर आली आहे. राजस्थानमधील भिवाडी इथे गुजरात एटीएस पथकाने छापेमारी करुन तब्बल २२ किलो ड्रग्ज जप्त केले आहे. याप्रकरणात एटीएसच्या पथकाने तीन आरोपींना रंगेहात पकडल्याने आरोपींना अटक करण्यात आली आहे. एटीएस अधिकाऱ्यांनी या ड्रग्ज कारखान्यावर छापा टाकून अल्प्राझोलम प्रिक्युसर केमिकल्स प्रकारचे ड्रग्ज जप्त केल्याची माहिती आहे. गुजरात एटीएसच्या पथकाने राजस्थानमधील ड्रग्ज कारखान्यावर केलेल्या छापेमारीत अंशुल अनिल कुमार शास्त्री, अखिलेश कुमार पारसनाथ मौर्य, कृष्ण कुमार श्री यादव अशी अटक करण्यात आलेल्या ड्रग्ज तस्करांची नावे आहेत.
गुजरात एटीएस पथकाने राजस्थान एसओजी, जयपूर आणि स्थानिक पोलिसांसोबत केलेल्या संयुक्त कारवाईमध्ये राजस्थानमधील खैरथल-तिजारा जिल्ह्यातील भिवाडी इथे एका औषध कारखान्यावर छापा टाकला. केली. गुजरात एटीएसनं खैरथल-तिजारा येथील भिवाडी गावात असलेल्या एपीएल फार्मा कंपनीवर हा छापा टाकला आहे. या कारखान्यातून तब्बल २२ किलो बेकायदेशीरपणे उत्पादित सायकोट्रॉपिक ड्रग्ज जप्त करण्यात आले. या छाप्यादरम्यान अल्प्राझोलम प्रिक्युसर केमिकल्स आणि अर्धप्रक्रिया केलेले ड्रग्ज देखील जप्त करण्यात आले.
ढाका: बांग्लादेशच्या पहिला महिला पंतप्रधान खालिदा जिया यांनी आज सकाळी अखेरचा श्वास घेतला आहे. मागील काही दिवसांपासून त्या वयोमानानुसार उद्भावणाऱ्या ...
राजस्थानमधील एका पोलिस ठाण्यात एनडीपीएस कायद्याच्या कलम ८ आणि २२ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गुजरात एटीएसने संयुक्त पद्धतीने केलेल्या छापेमारीनंतर संबंधित ठिकाणी पुर्णपणे शोधमोहीम राबवण्यात येत आहे. या तस्करांचा आंतरराज्यीय संबंधांचा संशय एटीएसच्या पथकाला आहे. दरम्यान, जप्त केलेला ड्रग्जसाठा फॉरेन्सिक तपासणीसाठी पाठवला आहे. आंतरराज्यीय संबंधांचा शोध घेण्यासाठी पुढील तपास सुरू आहे, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे. गुजरात एटीएसने राजस्थानात छापेमारी केल्याने स्थानिक पोलिसांचे धाबे दणाणले आहेत. या तस्करांचे इतर राज्यात धागेदोरे असल्याचा संशय एटीएसच्या पथकाला आहे.
या महिन्याच्या सुरुवातीला, गुजरात एटीएसने राजस्थानच्या जोधपूर जिल्ह्यात मेफेड्रोन उत्पादन रॅकेटचा पर्दाफाश केला होता, मोठ्या प्रमाणात द्रव ड्रग्ज जप्त केले होते आणि अनेक आरोपींना अटक केली होती.






