Tuesday, December 30, 2025

छत्तीसगडमध्ये अनेक ठिकाणी ईडीचे छापे

छत्तीसगडमध्ये अनेक ठिकाणी ईडीचे छापे

रायपूर : भारतमाला प्रकल्पासाठी जमीन अधिग्रहण करताना दिल्या जाणाऱ्या मोबदल्यात झालेल्या अनियमिततांच्या प्रकरणी अंमलबजावणी संचनालयाने (ईडी) छत्तीसगडमध्ये अनेक ठिकाणी छापेमारी केली आहे.ईडीने सोमवारी रायपूर आणि महासमुंद येथे एकूण ९ ठिकाणी झडती घेतली. या कारवाईत हरमीत सिंग खनुजा, त्यांचे कथित सहकारी, काही सरकारी अधिकारी तसेच जमीन मालकांशी संबंधित ठिकाणांचा समावेश आहे. रायपूर ते विशाखापट्टणम दरम्यान भारतमाला प्रकल्पाअंतर्गत उभारण्यात येणाऱ्या रस्त्यासाठी जमीन अधिग्रहणाच्या मोबदल्याच्या वितरणात झालेल्या कथित अनियमिततांच्या चौकशीसाठी ही कारवाई करण्यात येत आहे.

Comments
Add Comment