Monday, December 29, 2025

मुंबईत फक्त ‘जय श्रीरामचे’च नारे लागले पाहिजेत!

मुंबईत फक्त ‘जय श्रीरामचे’च नारे लागले पाहिजेत!

मंत्री नितेश राणे यांचे मतदारांना आवाहन; सुरक्षित मुंबईसाठी महायुती हा सक्षम पर्याय

मुंबई : “टाटा सामाजिक विज्ञान संस्थेने (टीस) अलिकडे जाहीर केलेल्या अहवालानुसार हिंदू लोकसंख्या सातत्याने कमी होत असून, जिहादी मानसिकतेची लोकसंख्या वाढत आहे. ही धोक्याची घंटा असून, मुंबई सुरक्षित ठेवण्यासाठी आणि मुंबईचा महापौर ‘आय लव्ह महादेव’वाला बनवण्यासाठी महायुती हा सक्षम पर्याय आहे”, असे आवाहन राज्याचे कॅबिनेट मंत्री नितेश राणे यांनी सोमवारी केले.

माध्यमांशी संवाद साधताना मंत्री राणे म्हणाले, मुंबई पालिका निवडणूक आम्ही कोणाला कमी लेखण्यासाठी किंवा पराभूत करण्यासाठी लढत नाही. मुंबईकरांचा विकास आणि सुरक्षा, या दोन विषयांवर आम्ही ही निवडणूक लढवत आहोत. आमच्यासाठी निवडणूक हे एक साधन आहे. कारण, निवडणूक जिंकल्यानंतर आमचे महापौर, उपमहापौर, नगरसेवकांच्या माध्यमातून मुंबईला एक सुरक्षित शहर, विकसित शहर बनवण्याचे अधिकार आमच्याकडे येतील. ते अधिकार वापरून आम्ही मुंबईला एक हिंदुत्ववादी विचारांनीयुक्त असे सुरक्षित शहर कशाप्रकारे बनवू शकतो, या दृष्टीकोनातून आम्ही या निवडणुकीकडे पाहतो आहोत. याच विचारांच्या उमेदवारांसह आम्ही ही निवडणूक लढवत आहोत. म्हणून मुंबईला सुरक्षित ठेवण्यासाठी, मुंबईचा महापौर ‘आय लव्ह महादेव’वाला बनवण्यासाठी महायुती हा सक्षम पर्याय मुंबईकरांसमोर आहे.

अलिकडे ‘टीस’चा जो अहवाल प्रसिद्ध झाला, त्यात हिंदू समाजाची लोकसंख्या कमी होत चालल्याचे नमूद करण्यात आले आहे. जिहादी मानसिकतेची लोकसंख्या वाढणे, ही धोक्याची घंटा आहे. आम्ही राष्ट्रभक्त विचारांची लोक आहोत. आमच्यासाठी राष्ट्र प्रथम आहे. त्यामुळे आमच्यासाठी ही निवडणूक मुंबईला सुरक्षित ठेवण्याच्या दृष्टीकोनातून अतिशय महत्त्वाची आहे. बांगलादेश, लंडनसह जगातील विविध देशांत जे सुरू आहे, तो हिरवा शाप मुंबईला लागू द्यायचा नाहीये. मुंबईत फक्त ‘जय श्रीरामचे’च नारे लागले पाहिजेत, येथे ‘सर तन से जुदा’चे नारे चालणार नाहीत! हाच विचार घेऊन आम्ही मुंबईकरांसमोर जाणार आहोत, असेही नितेश राणे यांनी स्पष्ट केले.

मुंबईकर मतदार जिहाद्यांना चोख प्रत्युत्तर देणार

मुंबईचा महापौर खान-पठाण, बुरखाधारी झाला तर काय अडचण आहे, असा सवाल एमआयएमचे माजी आमदार वारिस पठाण यांनी केला होता. त्याला सडेतोड उत्तर देताना नितेश राणे म्हणाले, अशाप्रकारची वक्तव्ये ही मुंबईतील हिंदू समाजाला डिवचण्यासाठी आहेत. गज्वाए-हिंद अंतर्गत या हिंदूराष्ट्राला इस्लामिक राष्ट्र बनवण्याची यांची योजना आहे, त्याची सुरुवात मुंबईतून करू दाखवू, असे वातावरण निर्माण करण्याचा प्रयत्न या वक्तव्यांच्या मागे आहे. कदाचित वारिस पठाणला माहिती नसेल, असे १०० हिरवे साप ठेचत ठेचत मुंबई उभी राहिली आहे. ९२-९३ च्या दंगलीत मुंबईतील हिंदू संपवण्याचा विचार या जिहादी मानसिकतेच्या लोकांनी केला होता. त्या सगळ्यांना ठेचत ठेचत मुंबईतील हिंदू समाज वर्षानुवर्षे इथे राहतो आहे. अशा जिहादी प्रवृत्तीच्या माणसांनी आमच्या मुंबईकडे वाकड्या नजरेने बघितले, तर त्याला चोख प्रत्युत्तर येणाऱ्या १५ जानेवारीला मुंबईकर जनता देईल.

Comments
Add Comment