Saturday, December 27, 2025

केरळमध्ये पहिल्यांदाच भाजपचा महापौर

केरळमध्ये पहिल्यांदाच भाजपचा महापौर

तिरुवनंतपुरम : केरळमध्ये पहिल्यांदाच भाजपचा महापौर निवडला गेला आहे. तिरुवनंतपुरम कॉर्पोरेशनमध्ये शुक्रवारी झालेल्या महापौर निवडणुकीत भाजपचे व्ही. व्ही. राजेश यांना ५१ मते मिळाली. यात एका अपक्ष नगरसेवकाचा त्यांना पाठिंबा आहे. डाव्या लोकशाही आघाडीच्या पी. शिवाजी यांना २९ मते मिळाली, तर काँग्रेस आघाडीचे उमेदवार के. एस. सबरीनाथन यांना १९ मते मिळाली. त्यापैकी दोन मते नंतर अवैध घोषित करण्यात आली.

Comments
Add Comment